• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final: टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू? इंग्लंड दौरा ठरणार शेवटचा!

WTC Final: टीम इंडियाच्या स्पेशल खेळाडूची उलटी गिनती सुरू? इंग्लंड दौरा ठरणार शेवटचा!

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू आहे. पावसामुळे या मुकाबल्याचा निकाल लागणं आता कठीण झालं आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 22 जून: भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) सुरू आहे. पावसामुळे या मुकाबल्याचा निकाल लागणं आता कठीण झालं आहे. या मॅचनंतरही भारतीय टीम इंग्लंडमध्येच राहणार आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात ऑगस्ट महिन्यापासून 5 टेस्ट मॅचची सीरिज सुरू होणार आहे. ही सीरिज टीम इंडियाचा टेस्ट स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याच्यासाठी करो या मरो सीरिज ठरू शकते. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये पुजारा 8 रनवर आऊट झाला. पुजाराने पहिली रन 36 व्या बॉलला काढली. 54 बॉलमध्ये 8 रन करून तो माघारी परतला. ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) पुजाराला एलबीडब्ल्यू केलं. पुजाराच्या 54 बॉलच्या खेळीत त्याने 2 फोर मारले, तर उरलेल्या एकाही बॉलवर त्याला रन काढता आली नाही. 2010 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पुजाराने 85 मॅचच्या 142 इनिंगमध्ये 6,244 रन केले. नाबाद 206 रन ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. पुजाराच्या नावावर टेस्टमध्ये 18 शतकं आणि 29 अर्धशतकं आहेत. पण आता करियर वाढवण्यासाठी पुजाराला इंग्लंड दौऱ्यात मोठी खेळी करावी लागणार आहे. याआधीच्या इंग्लंड दौऱ्यामध्येही पुजाराची कामगिरी निराशाजनक झाली होती, त्यामुळे यंदा हे रेकॉर्ड बदलण्याचं मोठं आव्हान त्याच्यापुढे असेल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पुजाराचा संघर्ष 2019 पासून आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात केली, पण या संपूर्ण स्पर्धेत पुजाराला संघर्ष करावा लागला. ऑगस्ट 2019 पासून पुजाराने 17 टेस्टमध्ये 29.21 च्या सरासरीने फक्त 818 रन केले आहेत. या दरम्यान त्याला एकही शतक करता आलं नाही. तसंच 28 इनिंगमध्ये त्याला फक्त 9 वेळा 50 रनचा आकडा गाठता आला आहे. इंग्लंडमध्ये पुजाराने 9 टेस्टमध्ये 29.41 च्या सरासरीने 500 रन केले. पुजाराला सुरुवात मिळाल्यानंतर मोठा स्कोअर करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी दिली. फायनलआधी घरच्या मैदानात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्येही पुजाराची कामगिरी खराब झाली. 4 टेस्टच्या 6 इनिंगमध्ये त्याने 73, 15, 21, 7,0 आणि 17 रन केले. त्याआधी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या 4 मॅचच्या 8 इनिंगमध्ये पुजाराला 43, 0, 17,3, 50, 77, 25, 56 रन करता आले. पुजाराचा हा फॉर्म त्याच्या नावाला नक्कीच साजेसा नाही.
  Published by:Shreyas
  First published: