• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final, LIVE : टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची गरज

WTC Final, LIVE : टीम इंडियाची निराशाजनक कामगिरी, न्यूझीलंडला विजयासाठी 139 रनची गरज

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा (World Test Championship Final) आजचा अखेरचा दिवस आहे.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये टीम इंडियाचे बॅट्समन सपशेल अपयशी ठरले आहेत. अखेरच्या दिवशी टीम इंडियाचा 170 रनवर ऑल आऊट झाला आहे, त्यामुळे न्यूझीलंडला आता विजयासाठी 138 रनची गरज आहे. अखेरच्या दिवसाची सुरुवात भारताने 64/2 अशी केली होती, पण दिवसाच्या सुरुवातीलाच काईल जेमिसनने भारताला विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या रुपात दोन धक्के दिले. यानंतर अजिंक्य रहाणेही लवकर माघारी परतला. ऋषभ पंतने 41 रनची खेळी केली. न्यूझीलंडकडून टीम साऊदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर बोल्टला 3 विकेट मिळाल्या. काईल जेमिसनने 2 आणि नील वॅगनरने 1 विकेट घेतली. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचा (World Test Championship Final) आजचा अखेरचा दिवस आहे. पावसामुळे या सामन्यात बराच वेळ फुकट गेल्यामुळ सहाव्या राखीव दिवशी खेळ होणार आहे. या टेस्टच्या पहिल्या आणि चौथ्या दिवशी पावसामुळे खेळ होऊ शकला नाही, तर पाचव्या दिवशीही पावसामुळेच सामना एक तास उशीरा सुरू झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही खराब प्रकाशामुळे संपूर्ण दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. सहाव्या दिवशी मात्र साऊथम्पटनमध्ये दिवसभर उन्ह असणार आहे, ज्यामुळे दिवसाचा खेळ पूर्ण होऊ शकतो. LIVE SCORE पाहण्यासाठी क्लिक करा पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 64/2 असा होता, तसंच टीम इंडियाकडे 32 रनची आघाडी होती. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन ओपनरच्या रुपात धक्के लागले. न्यूझीलंडच्या टीम साऊदीला या दोन्ही विकेट मिळाल्या. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा 12 रनवर तर विराट कोहली 8 रनवर खेळत आहे. पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचा 249 रनवर ऑल आऊट झाला, पण किवी टीमला महत्त्वाची अशी 32 रनची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माला 3 विकेट मिळाल्या. आर.अश्विनला 2 आणि जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 54 रन केले, तर कर्णधार केन विलियमसनने 49 रनची चिवट खेळी केली. काईल जेमिसन आणि टीम साऊदीने न्यूझीलंडला ही आघाडी मिळवून देण्यात मदत केली. जेमिसनने 16 बॉलमध्ये 21 रन तर टीम साऊदीने 30 रन केले.
  Published by:Shreyas
  First published: