WTC Final रोमांचक अवस्थेत, पाचव्या दिवसाअखेर भारताला दोन धक्के

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 64/2 एवढा झाला आहे, ज्यामुळे टीमकडे सध्या 32 रनची आघाडी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 64/2 एवढा झाला आहे, ज्यामुळे टीमकडे सध्या 32 रनची आघाडी आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 22 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) रोमांचक अवस्थेमध्ये पोहोचली आहे. पाचव्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 64/2 एवढा झाला आहे, ज्यामुळे टीमकडे सध्या 32 रनची आघाडी आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताला शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) या दोन ओपनरच्या रुपात धक्के लागले. न्यूझीलंडच्या टीम साऊदीला या दोन्ही विकेट मिळाल्या. दिवसाअखेरीस चेतेश्वर पुजारा 12 रनवर तर विराट कोहली 8 रनवर खेळत आहे. या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे बुधवारी राखीव दिवशी सामना खेळवण्यात येणार आहे.  पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या बॉलरनी भेदक बॉलिंग केली. पहिल्या इनिंगमध्ये न्यूझीलंडचा (India vs New Zealand) 249 रनवर ऑल आऊट झाला, पण किवी टीमला महत्त्वाची अशी 32 रनची आघाडी घेतली. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या, तर इशांत शर्माला 3 विकेट मिळाल्या. आर.अश्विनला 2 आणि जडेजाला 1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून डेवॉन कॉनवेने सर्वाधिक 54 रन केले, तर कर्णधार केन विलियमसनने 49 रनची चिवट खेळी केली. काईल जेमिसन आणि टीम साऊदीने न्यूझीलंडला ही आघाडी मिळवून देण्यात मदत केली. जेमिसनने 16 बॉलमध्ये 21 रन तर टीम साऊदीने 30 रन केले. पाचव्या दिवशीही सुरुवातीला पाऊस पडल्यामुळे मॅच एक तास उशीरा सुरू झाली. याआधी पहिला आणि चौथा दिवस पावसामुळे रद्द झाला होता. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही खराब प्रकाशामुळे संपूर्ण ओव्हरचा खेळ झाला नव्हता. या सामन्यासाठी आयसीसीने एक दिवस राखीव ठेवला आहे, त्यामुळे उरलेल्या ओव्हर राखीव दिवशी खेळवल्या जाणार आहेत.
    Published by:Shreyas
    First published: