मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : दिवसाअखेर भारताला दोन विकेट घेण्यात यश, सामन्यावर न्यूझीलंडची पकड

WTC Final : दिवसाअखेर भारताला दोन विकेट घेण्यात यश, सामन्यावर न्यूझीलंडची पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने धमाक्यात पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने धमाक्यात पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडच्या टीमने धमाक्यात पुनरागमन केलं आहे. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला आहे.

साऊथम्पटन, 20 जून: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) तिसऱ्या दिवसाचा खेळ खराब प्रकाशामुळे थांबवण्यात आला आहे. दिवसाअखेरीस न्यूझीलंडचा स्कोअर 101/2 विकेट एवढा झाला आहे. किवी टीम अजूनही 116 रनने पिछाडीवर आहे. दिवसाच्या शेवटच्या सत्रामध्ये भारताला दोन विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडचे ओपनर टॉम लेथम (Tom Latham) आणि डेवॉन कॉनवे (Devon Conway) यांनी टीमला 70 रनची ओपनिंग पार्टनरशीप करून दिली. टॉम लेथम 30 रनवर तर डेवॉन कॉनवे 54 रनवर आऊट झाला. लेथमला अश्विनने आणि कॉनवेला इशांत शर्माने आऊट केलं.

त्याआधी न्यूझीलंडच्या टीमने धमाक्यात पुनरागमन केलं. तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये भारताचा 217 रनवर ऑल आऊट झाला.  काईल जेमिसनने या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्या, तर बोल्ट आणि वॅगनरला प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या. टीम साऊदीला एक विकेट घेण्यात यश आलं. भारताने तिसऱ्या दिवसाची सुरुवात 146/3 अशी केली होती, पण विराट कोहली (Virat Kohli)  एकही रन न करता माघारी परतला. जेमिसनने विराटला 44 रनवर एलबीडब्ल्यू केलं.

विराटची विकेट गेल्यानंतर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 49 रनवर, ऋषभ पंत 4 रनवर आणि आर. अश्विन 22 रनवर आऊट झाले. अजिंक्यला वॅगनरने, पंतला जेमिसनने आणि अश्विनला साऊदीने माघारी पाठवलं.

भारत-न्यूझीलंड (India vs New Zealand) सामन्यामध्ये पुन्हा एकदा पावसाने व्यत्यय आणला, त्यामुळे तिसऱ्या दिवशीही सामना सुरू व्हायला उशीर झाला. भारतीय वेळेनुसार सामना दुपारी 3.30 वाजता सुरू झाला.

पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही, तसंच दुसऱ्या दिवशीही पाऊस आणि कमी प्रकाशामुळे मॅच फक्त 64.4 ओव्हरच खेळवली गेली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर 146/3 एवढा झाला.

या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण दोघांनाही मोठा स्कोअर उभारता आला नाही. रोहित शर्मा 34 रनवर आणि शुभमन गिल 28 रनवर आऊट झाले. यानंतर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) 54 बॉलमध्ये 8 रन करून माघारी परतला. न्यूझीलंडकडून जेमिसन, वॅगनर आणि बोल्टला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

टेस्ट क्रिकेटला रोमांचक करण्यासाठी आयसीसीने दोन वर्षांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला (World Test Championship Final) सुरुवात केली, यानंतर भारत आणि न्यूझीलंडच्या टीम फायनलला पोहोचल्या. विराट कोहली आणि केन विलियमसन यांना अजूनपर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही, त्यामुळे हे दोघंही हा सामना जिंकण्यासाठी जीवापाड मेहनत करत आहेत.

First published:

Tags: Cricket news, New zealand, Team india