• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही? मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला

WTC Final : विलियमसनने रिव्ह्यू घेतला का नाही? मैदानात गोंधळ, विराटही चक्रावला

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) साऊथम्पटनमध्ये सुरुवात झाली आहे, पण दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डीआरएसवरून (DRS) मैदानात गोंधळ पाहायला मिळाला.

 • Share this:
  साऊथम्पटन, 19 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला (World Test Championship Final) साऊथम्पटनमध्ये सुरुवात झाली आहे, पण दिवसाच्या दुसऱ्या सत्रामध्ये डीआरएसवरून (DRS) मैदानात गोंधळ पाहायला मिळाला. 41 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला हा प्रकार घडला. ट्रेन्ट बोल्टने (Trent Boult) लेग साईडला टाकलेला बॉल विराट कोहलीने (Virat Kohli) फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला, पण बॉल विकेट कीपर बीजे वॉटलिंगच्या (BJ Watling) हातात गेला. यानंतर वॉटलिंग आणि बोल्टने अपील केलं. ट्रेन्ट बोल्ट याला विराट कोहली आऊट असल्याचं वाटलं, पण केन विलियमसन (Kane Williamson) मात्र डीआरएस घ्यायचा का नाही यावरून गोंधळात दिसला, अखेर 15 सेकंदाची वेळ संपल्यानंतर अंपायर थर्ड अंपायरकडे गेले. न्यूझीलंडचे रिव्ह्यू शिल्लक असताना आणि केन विलियमसनने रिव्ह्यू घेतलेला नसतानाही अंपायर थर्ड अंपायरकडे का गेले? मैदानातल्या अंपायरने रिव्ह्यू घेतलेला असतानाही थर्ड अंपायरने अल्ट्रा एजची पाहणी का केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विराट कोहलीनेही याबाबत अंपायला विचारणा केली. अंपायरनी वॉटलिंगने बॉल नीट पकडला का नाही, हे पाहण्यासाठी थर्ड अंपायरला विचारणा केल्याचं विराटला वाटलं. मैदानात हा सगळा गोंधळ झाल्यानंतरही विराट कोहलीला थर्ड अंपायरने नॉट आऊट दिलं. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग यानेही या निर्णयावरून आश्चर्य व्यक्त केलं. या सामन्यात न्यूझीलंडच्या टीमने पहिल्या सत्रामध्येच एक रिव्ह्यू गमावला. रोहित शर्मा बॅटिंग करत असताना केन विलियमसनने एलबीडब्ल्यूसाठी रिव्ह्यू घेतला, पण रोहितच्या बॅटला बॉल लागून मग पायाला लागल्याचं समोर आलं, त्यामुळे न्यूझीलंडला एक रिव्ह्यू गमवावा लागला. पहिल्या सत्रामध्ये भारताने चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित शर्मा आणि शुभमन गिलची विकेट गमावली, यानंतर दुसऱ्या सत्रात चेतेश्वर पुजारा 54 बॉलमध्ये 8 रन करून आऊट झाला.
  Published by:Shreyas
  First published: