Home /News /sport /

WTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा

WTC Final : वॅगनरचा बॉल डोक्याला लागला, थोडक्यात बचावला पुजारा

टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरला.

    साऊथम्पटन, 19 जून : टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या (World Test Championship Final) पहिल्या इनिंगमध्ये अपयशी ठरला. पहिल्या इनिंगमध्ये तो फक्त 8 रन करून आऊट झाला. संपूर्ण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पुजाराला एकही शतक करता आलेलं नाही. या स्पर्धेत त्याला 9 अर्धशतकं करता आली, तर मागच्या 6 इनिंदमध्ये पुजाराला एकदाही इनिंगमध्ये 25 रनचा आकडा ओलांडता आला नाही. टीम इंडियासाठी हा चिंतेचा विषय असेल. 37 व्या ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉलवर न्यूझीलंडचा फास्ट बॉलर नील वॅगनरने टाकलेला जलद बाऊन्सरवर पुजाराने पूल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि बॉल हेल्मेटला जाऊन लागला. यानंतर लगेचच मैदानात मेडिकल टीम आली आणि पुजारावर उपचार करण्यात आले. नील वॅगनरने (Neil Wagner) टाकलेला बॉल लागल्यानंतर पुजाराला फार काही करता आलं नाही. 41 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर ट्रेन्ट बोल्टने पुजाराला एलबीडब्ल्यू केलं. मागच्या 4 इनिंगपैकी बोल्टने पुजाराला तिसऱ्यांदा आऊट केलं आहे. 29 इनिंगमध्ये फक्त 9 अर्धशतकं चेतेश्वर पुजारा फक्त टेस्ट मॅच खेळतो, त्यामुळे या फॉरमॅटमध्ये त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असते, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये तो अपयशी ठरला आहे. पुजाराने 18 सामन्यांच्या 29 इनिंगमध्ये 9 अर्धशतकं केली आहेत. 81 रन त्याचा सर्वाधिक स्कोअर आहे. या स्पर्धेत त्याने 28 च्या सरासरीने 826 रन केले, यात तो 3 वेळा शून्य रनवर आऊट झाला. दुसऱ्या इनिंगमध्ये पुजाराला बॅटिंगची संधी मिळाली, तर तो मोठी खेळी करण्यासाठी प्रयत्न करेल. रोहित-गिलची चांगली सुरुवात शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि रोहित शर्माने (Rohit Sharma) भारताला चांगली सुरुवात करून दिली, पण दोघांनाही मोठा स्कोअर करता आला नाही. रोहित शर्मा 34 रनवर तर शुभमन गिल 28 रन करून आऊट झाला. या दोघांनी तिसऱ्यांदा भारताला अर्धशतकीय पार्टनरशीप करून दिली. रोहितला काईल जेमिसनने तर गिलला नील वॅगनरने आऊट केलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Pujara, Team india

    पुढील बातम्या