• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : ...तरीही मैदान सोडून गेला नाही, लढवय्या वॉटलिंग

WTC Final : ...तरीही मैदान सोडून गेला नाही, लढवय्या वॉटलिंग

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडचा विकेट कीपर बीजे वॉटलिंग (BJ Watling) याची लढाऊ वृत्ती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली.

 • Share this:
  साऊथम्पटन, 23 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडचा विकेट कीपर बीजे वॉटलिंग (BJ Watling) याची लढाऊ वृत्ती क्रिकेट रसिकांना पाहायला मिळाली. एक थ्रो पकडताना बीजे वॉटलिंगच्या बोटाला बॉल लागला, यामध्ये वॉटलिंगचं बोट तुटलं, पण तरीही तो मैदान सोडून बाहेर गेला नाही. भारताचा ऑल आऊट होईपर्यंत वॉटलिंगने विकेट कीपिंग केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल ही वॉटलिंगची अखेरची मॅच आहे. या सामन्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याचं वॉटलिंगने आधीच सांगितलं आहे. याच कारणासाठी तो मैदान सोडून बाहेर गेला नाही. रविंद्र जडेजाला (Ravindra Jadeja) रन आऊट करण्याच्या नादात वॉटलिंगच्या बोटाला दुखापत झाली. फिल्डरचा जलद थ्रो पकडण्याच्या नादात बॉल वॉटलिंगच्या बोटाला लागला. त्याला खूप जास्त दुखत असल्याचंही दिसत होतं. बॉल लागल्यानंतर लगेचच न्यूझीलंडची मेडिकल टीम मैदानात आली आणि त्यांनी वॉटलिंगवर प्रथमोपचार केले. बोटाला पट्टी बांधून वॉटलिंग पुन्हा एकदा विकेट कीपिंगसाठी उभा राहिला. दुखापतीनंतर मैदानात राहण्याचा वॉटलिंगचा निर्णय नंतर योग्य ठरला, कारण नंतर त्यानेच जडेजाचा कॅच पकडला. लंचनंतर वॅगनरच्या (Neil Wagner) बॉलिंगवर लगेच जडेजा माघारी परतला. बीजे वॉटलिंगच्या क्रिकेट करियरमधला हा अखेरचा दिवस असल्यामुळे विराट कोहलीनेही (Virat Kohli) त्याला शुभेच्छा दिल्या. सहाव्या दिवशी विराट जेव्हा बॅटिंगला उतरला तेव्हा वॉटलिंगच्या जवळ जाऊन त्याने हस्तांदोलन करत शुभेच्छा दिल्या. वॉटलिंगने न्यूझीलंडसाठी टेस्ट क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली. 75 टेस्टमध्ये 37.52 च्या सरासरीने त्याने 3,790 रन केले, यामध्ये त्याने 8 शतकं आणि 19 अर्धशतकं केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या पहिल्या इनिंगमध्ये वॉटलिंगला एकच रन करता आली.
  Published by:Shreyas
  First published: