• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final : पावसानंतर आता बॅड लाईटचा खेळ, दिवसाअखेरीस विराट-अजिंक्य मैदानात

WTC Final : पावसानंतर आता बॅड लाईटचा खेळ, दिवसाअखेरीस विराट-अजिंक्य मैदानात

रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shumbhaman Gill) या दोन्ही ओपनरनी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) चांगली सुरुवात करून दिली.

 • Share this:
  साऊथम्पटन, 19 जून : भारत-न्यूझीलंड सामन्यातला पहिला दिवस पावसामुळे फुकट गेल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी बॅड लाईटमुळे व्यत्यय आला आहे. खराब प्रकाशामुळे अंपायरनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसाअखेरीस भारताचा स्कोअर 146/3 एवढा आहे. विराट कोहली (Virat Kohli) 44 रनवर आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) 29 रनवर खेळत आहेत. दुसऱ्या सत्रामध्ये भारताने चेतेश्वर पुजाराच्या रुपात एक विकेट गमावली. पुजारा 54 बॉलमध्ये 8 रन करून आऊट झाला. ट्रेन्ट बोल्टने पुजाराला एलबीडब्ल्यू केलं. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shumbhaman Gill) या दोन्ही ओपनरनी भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) चांगली सुरुवात करून दिली. पण या दोघांनाही मोठा स्कोअर करता आला नाही. रोहित शर्मा 68 बॉलमध्ये 34 रन केले, तर शुभमन गिल 64 बॉलमध्ये 28 रन करून माघारी परतला. या दोघांमध्ये 62 रनची पार्टनरशीप झाली. काईल जेमिसनने (Kyle Jamieson) रोहितला तर निल वॅगनरने (Neil Wagner) शुभमन गिलला आऊट केलं. लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) याने टॉस जिंकला आहे. केन विलियमसनने पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यामध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होत आहे. या सामन्यात भारताने अश्विन आणि जडेजा हे दोन स्पिनर उतवले आहेत, तर फास्ट बॉलिंगची जबाबदारी इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या तिघांवर असेल. टेस्ट क्रिकेटला आणखी रोमांचक करण्यासाठी आयसीसीने 2019 साली या स्पर्धेला सुरुवात केली. एकीकडे भारताने या सामन्यात दोन स्पिनर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला असताना न्यूझीलंडने मात्र एकाही स्पिनरला संधी दिलेली नाही. मॅचचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता साऊथम्पटनमध्ये उन्ह आलं आहे, ज्यामुळे क्रिकेट रसिक सुखावले आहेत. पहिला दिवस पावसामुळे फुकट गेला असला तरी आयसीसीने या सामन्यासाठी सहावा दिवस राखीव ठेवला आहे. पुढचे चार दिवस दिवसाला 8 ओव्हर म्हणजेच अर्धा तास जास्त खेळ होईल. यानंतरही सामन्याचा निकाल लागला नाही, तर सहाव्या दिवशी उरलेल्या ओव्हर खेळवल्या जातील. केन विलियमसन आणि विराट कोहली (Virat Kohli) यांना अजूनपर्यंत एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही कर्णधार जीवापाड मेहनत करतील. भारतीय टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर.अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह न्यूझीलंडची टीम टॉम लेथम, डेवॉन कॉनवे, केन विलियमसन, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग, कॉलिन डे ग्रॅण्डहोम, काईल जेमिसन, निल वॅगनर, टीम साऊदी, ट्रेन्ट बोल्ट
  Published by:Shreyas
  First published: