मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : टीम इंडियाची चिंता मिटली, फायनला मैदानात दिसणार नाही 'अनलकी' अंपायर

WTC Final : टीम इंडियाची चिंता मिटली, फायनला मैदानात दिसणार नाही 'अनलकी' अंपायर

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18-22 जूनमध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटनला खेळवली जाईल. या सामन्यासाठी आयसीसीने (ICC) अंपायरची घोषणा केली आहे.

  • Published by:  Shreyas

साऊथम्पटन, 8 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यातली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) 18-22 जूनमध्ये इंग्लंडच्या साऊथम्पटनला खेळवली जाईल. या सामन्यासाठी आयसीसीने (ICC) अंपायरची घोषणा केली आहे. आयसीसीच्या एलीट पॅनलमध्ये असणारे रिचर्ड एलिंगवर्थ (Richard Elingworth) आणि मायकल गफ (Michael Gough) हे मैदानातले अंपायर असतील, तर रिचर्ड केटलबोरो (Richard Kettleborough) थर्ड अंपायर आणि एलेक्स व्हार्फ फोर्थ अंपायर असतील.

आयसीसीने केलेली ही अंपायरची घोषणा टीम इंडियासाठी दिलासा असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या आहेत, कारण रिचर्ड केटलबोरो हे या सामन्यासाठी मैदानात अंपायरिंग करणार नाहीत. मागच्या चारही आयसीसी नॉक आऊट सामन्यांमध्ये केटलबोरो हे अंपायर असताना भारताचा पराभव झाला होता.

2014 भारत-श्रीलंका टी-20 वर्ल्ड कप फायनल, 2015 भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कप क्वार्टर फायनल, 2016 भारत-वेस्ट इंडिज टी-20 वर्ल्ड कप सेमी फायनल आणि 2019 भारत-न्यूझीलंड वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये केटलबोरो मैदानात अंपायर होते आणि टीम इंडियाच्या पदरी निराशा आली होती. 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल भारताने जिंकल्यानंतर आयसीसीच्या या चार स्पर्धा झाल्या आणि या चारही स्पर्धांमध्ये नॉक आऊट सामन्यात अपयश आलं.

काहीच दिवसांपूर्वी वसीम जाफर यानेही याबाबतचं एक मीम सोशल मीडियावर शेयर केलं होतं. वसीम जाफरचं हे मीम खूप व्हायरल झालं होतं.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 185 मॅच झाल्या, यातल्या 82 मॅच भारताने जिंकल्या, तर न्यूझीलंडला 69 मॅच जिंकता आल्या. या दोन्ही टीममध्ये 59 टेस्ट झाल्या, त्यापैकी भारताने 21 आणि न्यूझीलंडने 12 टेस्ट जिंकल्या. 110 वनडेमध्ये भारताला 55 आणि न्यूझीलंडला 49 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 16 टी-20 मध्ये भारताने 6 आणि न्यूझीलंडने 8 मुकाबले जिंकले.

कर्णधार म्हणून केन विलियमसन (Kane Williamson) याच्यापेक्षा विराटची कामगिरी सरस झाली आहे. विराटने 22 इनिंगमध्ये 877 रन केले, त्याची सरासरी 44 ची आहे, यात 2 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर केन विलियमसनने 14 इनिंगमध्ये 57 च्या सरासरीने 817 रन केले. विलियमसनला या स्पर्धेत 3 शतकं आणि एक अर्धशतक करता आलं.

First published:

Tags: Cricket, Icc, New zealand, Team india