WTC Final : इंग्लंडमध्ये बॅटिंग कशी करायची? अजिंक्य रहाणेने सांगितलं

टीम इंडिया (Team India) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship Final) तयारी करत आहे. 18 ते 22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनला हा मुकाबला रंगेल.

टीम इंडिया (Team India) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship Final) तयारी करत आहे. 18 ते 22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनला हा मुकाबला रंगेल.

  • Share this:
    साऊथम्पटन, 13 जून : टीम इंडिया (Team India) सध्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship Final) तयारी करत आहे. 18 ते 22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात साऊथम्पटनला हा मुकाबला रंगेल. इंग्लंडची खेळपट्टी फास्ट बॉलिंगला मदत करणारी असते, त्यामुळे टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) बॅट्समनना टिप्स दिल्या आहेत. इंग्लंडमध्ये टीम इंडियाची टेस्ट क्रिकेटमधली कामगिरी निराशाजनक राहिली आहे. पहिल्यांदाच भारत टेस्ट क्रिकेटमध्ये न्युट्रल ठिकाणी खेळणार आहे. बीसीसीआयशी बोलताना अजिंक्य रहाणे म्हणाला, 'जर तुम्ही एकदा सेट झालात तर इंग्लंड बॅटिंगसाठी चांगली जागा आहे. इथल्या खेळपट्ट्या आव्हानात्मक असतात, पण तुम्हाला बॉलला जवळून आणि सरळ खेळावं लागतं. आमच्यासाठी फायनल एका टेस्ट मॅचसारखीच आहे, यात आम्ही जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करू. मागच्या दोन वर्षांपासून आम्ही चांगली कामगिरी करत आहोत. जो निकाल लागेल तो आम्ही स्वीकारू.' 'भारतीय टीमने 2019 पासून आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये एक टीमप्रमाणे काम केलं आहे. संपूर्ण टीमने शानदार कामगिरी केली आहे. याच कारणामुळे आम्ही फायनलमध्ये पोहोचलो,' असं वक्तव्य रहाणेने केलं. अजिंक्य रहाणेने विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियात टीमचं नेतृत्व केलं आणि भारताला टेस्ट सीरिजमध्ये 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवून दिला. आपल्या करियरमधला हा कायम लक्षात राहिल असा क्षण आहे, असं रहाणे म्हणाला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताकडून शुभमन गिल, ऋषभ पंत, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत यांनी धमाकेदार कामगिरी केली, ज्यामुळे भारताला विजय मिळवता आला.
    Published by:Shreyas
    First published: