WTC Final : दोन द्विशतकं करणारा एकमेव बॅट्समन, तरी अन्याय! खेळणार नाही फायनल

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळणार आहे. यासाठी 15 सदस्यांच्या टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळणार आहे. यासाठी 15 सदस्यांच्या टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे.

  • Share this:
    साऊथम्पटन, 15 जून : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळणार आहे. यासाठी 15 सदस्यांच्या टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. स्पिनर म्हणून अश्विन (R Ashwin) आणि जडेजा (Ravindra Jadeja) या दोघांना संधी देण्यात आली आहे, पण अंतिम-11 मध्ये यांच्यापैकी फक्त एकालाच संधी मिळेल. 15 सदस्यांच्या या टीममध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिल (Shubhaman Gill) हे दोघं ओपनर आहेत, त्यामुळे मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) पत्ता कट झाला आहे. मयंक अग्रवालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये दोन द्विशतकं केली आहेत. हा रेकॉर्ड करणारा तो जगातला एकमेव खेळाडू आहे. मयंक अग्रवालने या स्पर्धेत 12 सामन्यात 20 इनिंगमध्ये 43 च्या सरासरीने 857 रन केले, यामध्ये 3 शतकं आणि 2 अर्धशतकांचा समावेश आहे. मयंकच्या या 3 शतकांमध्ये दोन द्विशतकं आहेत. मयंकने या स्पर्धेत चेतेश्वर पुजारापेक्षा जास्त रन केले आहेत, तरीही त्याला बाहेर बसवण्यात आलं. पुजाराने 17 सामन्यात 28 इनिंगमध्ये 29 च्या सरासरीने 818 रन केले. पुजाराला यात एकही शतक करता आलं नाही. या स्पर्धेत त्याला 9 अर्धशतकं करता आली. शुभमन गिलने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये 7 सामन्यात 13 इनिंगमध्ये 34 च्या सरासरीने 378 रन केले, पण त्यालाही शतक झळकावता आलं नाही, तरीही त्याला टीममध्ये स्थान देण्यात आलं. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी केल्यानंतर गिल इंग्लंडविरुद्धची सीरिज आणि आयपीएलमध्ये अपयशी ठरला. फायनलसाठी भारतीय टीम रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज न्यूझीलंडची टीम केन विलियमसन, टॉम ब्लंडेल, ट्रेन्ट बोल्ट, डेवॉन कॉनवे, कोलिन डि ग्रॅण्डहोम, मॅट हेन्री, काइल जेमिसन, टॉम लेथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग
    Published by:Shreyas
    First published: