WTC Final : विराटला आऊट कसं करायचं? स्टेनने किवींना सांगितलं सिक्रेट

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होत आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याने विराट कोहलीला आऊट कसं करायचं याचं सिक्रेट सांगितलं आहे.

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होत आहे. या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याने विराट कोहलीला आऊट कसं करायचं याचं सिक्रेट सांगितलं आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होत आहे. या महामुकाबल्याच्या पहिल्या दिवसाचं पहिलं सत्र पावसामुळे होऊ शकलं नाही, पण दोन्हीही टीम मैदानात उतरण्यासाठी आतूर आहेत. विराट कोहली (Virat Kohli) आणि केन विलियमसन (Kane Williamson) यांना त्यांच्या करियरमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे दोघंही हा सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. तसंच हे दोन्ही खेळाडू टीमसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे त्यांच्यासाठी विरोधी टीमने रणनितीही आखली असणार हे निश्चित. दक्षिण आफ्रिकेचा माजी फास्ट बॉलर डेल स्टेन (Dale Steyn) याने विराट कोहलीला आऊट कसं करायचं याचं सिक्रेट सांगितलं आहे. 'विराटसमोर असताना माईंड गेम्स खेळावे लागतात, त्यामुळे शॉर्ट लेगला एक खेळाडू लावला पाहिजे. तिकडे फिल्डर ठेवून आपण त्याच्या अंगावर बॉलिंग करणार असल्याचं दाखवून दिलं पाहिजे. विराटला शॉर्ट बॉल टाकून त्याला पूल करायला लावायचं, कारण हा शॉट त्याच्या बॅटिंगमधला प्लान बी असतो,' असं स्टेन म्हणाला. विराट कोहलीची विकेट घेण्यासाठी आपण कोणती रणनिती वापरायचो, याबाबतही स्टेनने सांगितलं. विराट कोहलीला सुरुवातीला ड्राईव्ह मारायला आवडतं, त्यामुळे बॉल स्विंग करत एलबीडब्ल्यू मिळण्याची किंवा विकेट कीपरकडे कॅच जाण्याची शक्यता सर्वाधिक असते. प्रत्येक बॅट्समन सुरुवातीचे 15-20 बॉल संघर्ष करतो, हीच वेळ कोहलीलाही अडचणीत आणण्यासाठी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया स्टेनने दिली. डेल स्टेन इएसपीएन क्रिकइन्फोवर संजय मांजरेकरांसोबत (Sanjay Manjrekar) बोलत होता.
    Published by:Shreyas
    First published: