Home /News /sport /

WTC Final आधीच टीम इंडियाने मानली हार? पुजारा म्हणाला...

WTC Final आधीच टीम इंडियाने मानली हार? पुजारा म्हणाला...

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 13 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाची भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी न्यूझीलंडची टीम इंग्लंडविरुद्ध (England vs New Zealand) दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळली, याचा त्यांना फायदा होईल, असं पुजाराला वाटतं. तसंच आम्हाला जेवढा वेळ मिळालाय त्यात आम्ही चांगली तयारी करू, असं पुजारा म्हणाला आहे. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर भारतीय टीम स्वत:च्याच दोन टीम बनवून मॅच खेळत आहे. तर न्यूझीलंडने इंग्लंडला त्यांच्याच मायभूमीत टेस्ट सीरिजमध्ये 1-0 ने पराभूत केलं आहे, ज्यामुळे त्यांची तयारी चांगली झाली आहे. तर दुसरीकडे भारतीय खेळाडू आयपीएल खेळत होते, पण कोरोना व्हायरसमुळे आयपीएल स्थगित करण्यात आली. बीसीसीआयसोबत बोलताना पुजारा म्हणाला, 'फायनलआधी दोन टेस्ट मॅच खेळल्यामुळे न्यूझीलंडची टीम नक्कीच फायद्यात असेल, पण फायनलसाठी आम्ही सर्वोत्कृष्ट प्रयत्न करू. आमच्या टीममध्ये चांगली कामगिरी करण्याची आणि चॅम्पियन बनण्याची क्षमता आहे, त्यामुळे आम्ही चिंतित नाही. आम्हाला तयारीसाठी 10 ते 12 दिवसांचा वेळ मिळाला आहे, त्यात आम्ही एकाग्र राहण्याचा प्रयत्न करू.' 'आम्ही एक सराव सामना खेळणार आहोत, यात उपलब्ध गोष्टींचा सर्वश्रेष्ठ वापर करण्याचा प्रयत्न असेल. जर आम्ही या दिवसांचा योग्य वापर केला तर आमची टीम फायनलच्या आव्हानासाठी तयार असेल. इंग्लंडच्या वातावरणात ढाळून घेणं टीमसाठी सगळ्यात मोठं आव्हान असेल,' अशी प्रतिक्रिया पुजाराने दिली. 'इंग्लंडमध्ये एकाच दिवशी दोन वेगवेगळी वातावरण असतात. अशा परिस्थितीमध्ये खेळणं बॅट्समनसाठी सगळ्यात मोठं आव्हान असतं, कारण जर पाऊस पडला तर तुम्हाला मैदानाबाहेर जावं लागतं. पाऊस थांबल्यानंतर तुम्हाला पुन्हा सुरुवात करावी लागते. माझ्यासाठी हा फॉरमॅट खूप महत्त्वाचा आहे, कारण मी फक्त यामध्येच खेळतो. इथपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही टीम म्हणून खूप मेहनत घेतली आहे. सगळे खेळाडू फायनलसाठी उत्सूक आहेत. आमच्यासाठी हा मुकाबला जिंकणं खूप महत्त्वाचं आहे, कारण मागच्या दोन वर्षांत आम्ही प्रचंड मेहनत घेतली आहे,' असं वक्तव्य पुजाराने केलं. भारतीय टीम एकजूट आहे कारण खेळाडूंनी बायो-बबलमध्ये चांगला वेळ घालवल्याचंही पुजाराने सांगितलं. पुजाराने भारताकडून 85 टेस्टमध्ये 6,244 रन केले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, New zealand, Pujara, Team india

    पुढील बातम्या