Home /News /sport /

WTC Final : विराट-रोहित नाही, तर या दोन खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त

WTC Final : विराट-रोहित नाही, तर या दोन खेळाडूंवर टीम इंडियाची भिस्त

विराट कोहली (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी उत्सूक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये होणार आहे.

पुढे वाचा ...
    साऊथम्पटन, 8 जून : विराट कोहली (Virat Kohli) आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला (Team India) पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी उत्सूक आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये होणार आहे. इंग्लंडच्या खेळपट्टीवर बॅटिंग करणं सोपं नसतं, त्यामुळे टीमला विजय मिळवून द्यायची भिस्त बॅट्समनवर असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम पहिल्या क्रमांकावर राहिली. भारताने ऑस्ट्रेलियाचा त्यांच्याच मायभूमीत 2-1 ने पराभव केला. या सीरिजमधल्या शेवटच्या 3 टेस्टमध्ये अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) कर्णधार होता. 2019 साली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात झाली. तेव्हापासूनचं रेकॉर्ड बघितलं तर चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे भारताच्या उत्कृष्ट कामगिरीचे आधार स्तंभ राहिले. या दोघांनी 9-9 इनिंगमध्ये 100 पेक्षा जास्त बॉल खेळले आहेत. कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मालाही (Rohit Sharma) असं करता आलं नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये खासकरून परदेशात विकेटवर उभं राहणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे फायनलमध्ये पुजारा आणि अजिंक्य रहाणेची कामगिरी महत्त्वाची ठरणार आहे. रहाणेने एका इनिंगमध्ये सर्वाधिक बॉल वेस्ट इंडिजविरुद्ध खेळले. 242 बॉलमध्ये त्याने 102 रन केले होते. तर चेतेश्वर पुजाराने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 211 बॉलमध्ये 56 रनची खेळी केली. विराट कोहलीने 7 वेळा तर रोहित शर्माने 5 वेळा 100 पेक्षा जास्त बॉल खेळले. सर्वाधिक द्विशतकं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक द्विशतकं केली आहेत. भारताच्या तीन खेळाडूंनी 4 द्विशतकं तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून प्रत्येकी 3-3, न्यूझीलंडकडून 2, वेस्ट इंडिज श्रीलंकेकडून एक द्विशतक करण्यात आलं. भारताकडून मयंक अग्रवालने (Mayank Agarwal) दोन तर विराट कोहली आणि रोहित शर्माने एक द्विशतक केलं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये अजिंक्य रहाणेने सर्वाधिक रन केले आहेत. अजिंक्यने 28 इनिंगमध्ये 44 च्या सरासीरने 1,095 रन केले, यामध्ये 3 शतकं आणि 6 अर्धशतकं आहेत. रोहितने 17 इनिंगमध्ये 64 च्या सरासरीने 1030 रन बनवले. अजिंक्य आणि रोहितशिवाय कोणत्याही भारतीय खेळाडूला एक हजार रनचा टप्पा गाठता आला नाही. विराट कोहलीने 877 रन, मयंक अग्रवालने 857 रन केले, तर चेतेश्वर पुजाराला 818 रन करता आले. विलियमसनपेक्षा कोहली भारी कर्णधार म्हणून केन विलियमसन (Kane Williamson) याच्यापेक्षा विराटची कामगिरी सरस झाली आहे. विराटने 22 इनिंगमध्ये 877 रन केले, त्याची सरासरी 44 ची आहे, यात 2 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. तर केन विलियमसनने 14 इनिंगमध्ये 57 च्या सरासरीने 817 रन केले. विलियमसनला या स्पर्धेत 3 शतकं आणि एक अर्धशतक करता आलं. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून 185 मॅच झाल्या, यातल्या 82 मॅच भारताने जिंकल्या, तर न्यूझीलंडला 69 मॅच जिंकता आल्या. या दोन्ही टीममध्ये 59 टेस्ट झाल्या, त्यापैकी भारताने 21 आणि न्यूझीलंडने 12 टेस्ट जिंकल्या. 110 वनडेमध्ये भारताला 55 आणि न्यूझीलंडला 49 सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर 16 टी-20 मध्ये भारताने 6 आणि न्यूझीलंडने 8 मुकाबले जिंकले.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, New zealand, Pujara, Team india

    पुढील बातम्या