मुंबई, 7 जून : भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18-22 जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) खेळवली जाणार आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये हा सामना रंगेल. पण या मुकाबल्यासाठी टीमची निवड करताना विराट कोहलीसाठी (Virat Kohli) डोकेदुखी ठरणार आहे. भारताचा माजी फास्ट बॉलर अजित आगरकर (Ajit Agarkar) याने मात्र या सामन्यासाठी टीम इंडियाची निवड केली आहे.
ओपनर म्हणून अजित आगरकरने आश्चर्यकारकरित्या शुभमन गिलऐवजी मयंक अग्रवालची निवड केली आहे. मयंक हा सुरुवातीला टीम इंडियाचा निश्चित ओपनर होता, पण ऑस्ट्रेलियात पहिल्या दोन सामन्यांमधल्या खराब कामगिरीनंतर शुभमन गिलला ही जबाबदारी मिळाली. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गिलने उत्तम कामगिरी केली असली तरी भारतात इंग्लंडविरुद्ध झालेल्या सीरिजमध्ये तो अपयशी ठरला.
आगरकरने तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर पुजारा, विराट आणि रहाणेला संधी दिली आहे, तर विकेट कीपर म्हणून ऋषभ पंत खेळेल. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात दोन स्पिनर घेऊन खेळायचे का एकाच स्पिनरला संधी द्यायची, हा कठीण निर्णय विराटला घ्यावा लागणार आहे. पण आगरकरने मात्र टीममध्ये अश्विन आणि जडेजा या दोन स्पिनरचा समावेश केला जावा, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच तीन फास्ट बॉलर म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा यांची निवड होईल, असं आगरकरला वाटत आहे.
अजित आगरकरची टीम
रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, रवी अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह
भारतीय टीम
रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर.अश्विन, रविंद्र जडेजा, अक्सर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, ऋद्धीमान साहा
स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, New zealand, Team india, Virat kohli