• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • न्यूझीलंडला टक्कर देईल ही मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

न्यूझीलंडला टक्कर देईल ही मजबूत टीम, विराटला स्थान नाही!

न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव करत मानाची गदा पटकावली. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानात सगळ्या सीरिज जिंकल्या.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : न्यूझीलंडच्या टीमने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव करत मानाची गदा पटकावली. दोन वर्ष चाललेल्या या स्पर्धेत न्यूझीलंडच्या टीमने घरच्या मैदानात सगळ्या सीरिज जिंकल्या. न्यूझीलंडने मायदेशात भारत, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध 2-2 मॅच जिंकल्या. हे आकडे पाहता न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करणं कठीण असल्याचं दिसून येतं. पण भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने एक जागितक टीमची निवड केली आहे, जी किवी टीमचा त्यांच्या घरच्या मैदानात पराभव करू शकते. या टीममध्ये विराट कोहलीला (Virat Kohli) स्थान देण्यात आलेलं नाही. आकाश चोप्राने त्याच्या वर्ल्ड इलेव्हनमध्ये भारताच्या तीन खेळाडूंचा, ऑस्ट्रेलियाच्या चार, इंग्लंडच्या तीन खेळाडूंचा समावेश केला आहे. तसंच त्याने श्रीलंकेच्या एका खेळाडूला संधी दिली आहे. रोहित-करुणारत्ने ओपनर आकाश चोप्राने त्याच्या टीममध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेची (Dimuth Karunaratne) ओपनर म्हणून निवड केली आहे. याशिवाय वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये सर्वाधिक रन करणाऱ्या मार्नस लाबुशेनलाही (Marnus Labuschagne) संधी दिली आहे. आकाश चोप्राच्या टीममध्ये स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) आणि बेन स्टोक्सही (Ben Stokes) आहेत. तसंच टीमचं नेतृत्व जो रूटकडे देण्यात आलं आहे. विकेट कीपर म्हणून टीममध्ये ऋषभ पंत (Rishabh Pant) आहे, तर स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा आर.अश्विन (R Ashwin) एकमेव स्पिनर आहे. आकाश चोप्राची टीम रोहित शर्मा, दिमुथ करुणारत्ने, मार्नस लाबुशेन, जो रूट (कर्णधार), स्टीव स्मिथ, बेन स्टोक्स, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, पॅट कमिंस, स्टुअर्ट ब्रॉड, जॉश हेजलवूड
  Published by:Shreyas
  First published: