भारताचा आणखी एक स्टार खेळाडू होणार बाबा, ट्विटरवरून दिली Good News!

अजिंक्य रहाणेनंतर आणखी एक भारतीय खेळाडूच्या घरी हलणार पाळणा.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 05:54 PM IST

भारताचा आणखी एक स्टार खेळाडू होणार बाबा, ट्विटरवरून दिली Good News!

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारतीय संघाचा एकदिवसीय, टी-20 आणि कसोटीमध्ये यशस्वी कामगिरी सुरू आहे. वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघाला नमवल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या कसोटी सामन्यात भारताचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणे बाबा झाला. आता आणखी एका स्टार खेळाडूच्या घरी पाळणा हलणार आहे.

भारतीय कसोटी संघाचा विकेटकीपर फलंदाज ऋध्दीमान साहाच्या घरी पुन्हा एकदा एक चिमुकला येणार आहे. आपल्या दमदार किपिंग आणि उत्कृष्ठ कॅचमुळे दक्षिण आफ्रिका विरोधात साहाची विशेष चर्चा होती. दरम्यान साहानं ट्विटरवरून बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. साहाला एक मुलगी आहे. त्यानं आपल्या मुली आणि पत्नीसोबतचा एक फोटो टाकत ही बातमी दिली.

वाचा-पंजाबचा किंग युवराज सिंग झाला ‘मराठा’! या स्पर्धेत गाजवणार मैदान

साहानं आपल्या 35व्या वाढदिवसानिमित्त ही बातमी दिली. साहाची पत्नी रोमी मित्रा लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. साहानं ट्वीट करत, “हा वाढदिवस माझ्यासाठी विशेष आहे. आम्ही आमच्या परिवारात एका नवीन सदस्याच्या स्वागताची वाट पाहत आहोत. मला अभिमान आहे की मी दुसऱ्यांदा ही घोषणा करतो आहे”, असे सांगितले.

वाचा-पुढच्या IPLमध्ये जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स सोडणार? ‘या’ फोटोमुळं खळबळ

Loading...

वाचा-मॉलमध्ये पाणी विकताना दिसला विराट कोहली, पाहा काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

ऋध्दीमान साहानं 2015मध्ये भारतीय कसोटी संघात पदार्पण केले. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर साहा भारताचा विकेटकीपर झाला. दरम्यान जवळ जवळ दीड वर्ष दुखापतीमुळं साहा क्रिकेटपासून दूर होता. मात्र वेस्ट इंडिज दौऱ्यात त्याला संघात स्थान मिळाले. मात्र त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. दरम्यान या दौऱ्यात ऋषभ पंत चांगली कामगिरी करू न शकल्यामुळं दक्षिण आफ्रिका दौऱ्यात साहाला संधी मिळाली आणि त्यानं या संधीचे सोनं केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2019 05:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...