मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : ऋषभ पंतमुळे कारकीर्द संकटात? पाहा काय म्हणाला ऋद्धीमान साहा

IND vs ENG : ऋषभ पंतमुळे कारकीर्द संकटात? पाहा काय म्हणाला ऋद्धीमान साहा

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये (India vs Australia) टीम इंडियाचा विकेट कीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) याने धमाकेदार कामगिरी केली, त्यामुळे ऋद्धीमान साहा याची कारकिर्द धोक्यात आल्याचं बोललं जात आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 25 जानेवारी : टीम इंडियाचा अनुभवी विकेट कीपर ऋद्धीमान साहा (Wriddhiman Saha) याने 2010 साली नागपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्टमधून पदार्पण केलं होतं. या 10 वर्षांमध्ये साहाने फक्त 38 टेस्ट खेळल्या, ज्यामध्ये 3 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून साहा भारताचा टेस्ट क्रिकेटमधला नंबर-1 कीपर आहे, पण ग्लोव्हज घालून केलेली कामगिरी साहाला बॅटिंगमध्ये करता आली नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात (India vs Australia) ऍडलेडमध्ये झालेल्या डे-नाईट टेस्टनंतर साहाला टीममधून बाहेर काढण्यात आलं आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) ला संधी देण्यात आली. ऍडलेड टेस्टच्या दोन्ही इनिंगमध्ये साहाने 9 आणि 4 रन केल्या होत्या. या मॅचच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा फक्त 36 रनवर ऑल आऊट झाला होता. यानंतर सीरिजच्या उरलेल्या तिन्ही मॅचमध्ये पंतला संधी देण्यात आली. पंतनेही मिळालेल्या या संधीचं सोनं केलं आणि ब्रिस्बेन टेस्टमध्ये नाबाद 89 रन करत भारताला ऐतिहासिक विजय मिळून दिला. पंतच्या या कामगिरीमुळे साहा याची कारकीर्द धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. या सगळ्या प्रश्नांवर साहा याने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली आहे. 'माझी आणि ऋषभची तुलना मी 2018 पासून ऐकतो आहे. मी स्वत:चं काम करण्यावर विश्वास ठेवतो, ऋषभ पंतच्या बॅटिंगबाबत मी चिंतित नाही. त्याच्यामुळे मी माझा खेळ बदलणार नाही. स्टम्पमागे कोण उभं राहिल, हा टीमचा निर्णय असेल,' असं साहा म्हणाला. 36 वर्षांच्या साहाने ऍडलेड टेस्टमध्ये स्टार्कला खेळेलला शॉट चुकीचा होता, याची कबुली दिली आहे. 'बॉल ऑफसाईडपासून लांब होता, तो शॉट खेळण्याचा माझा निर्णय चूक होता. पण दुसऱ्या इनिंगमध्ये मिडविकेटवरून मी नेहमी फ्लिक मारतो. दुर्दैवाने त्यावेळी तिकडे फिल्डर होता. तो दिवस आमच्यासाठी खराब होता,' अशी प्रतिक्रिया साहाने दिली. 'एक चूक मॅचचा परिणाम बदलू शकते. विकेट कीपिंग एक स्पेशलिस्ट काम आहे, खासकरून टेस्ट क्रिकेटमध्ये. मी प्रत्येक कॅच पकडू शकतो, असा दावा करत नाही, पण ही जागा तज्ज्ञाची आहे आणि ती तशीच राहिली पाहिजे,' असं साहाने सांगितलं. ऋषभ पंतवर कॅच सोडल्यामुळे होत असलेल्या टीकेवरही साहाने प्रतिक्रिया दिली. 'आता पंत विकेट कीपिंग करत आहे, तो याच्यावर नक्कीच काम करत असेल, त्यामुळे कीपिंग सुधारण्याचा तो प्रयत्न करेल. टीम प्रशासनाला त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. प्राथमिकता बॅटिंग का कीपिंग, याबाबत पंतला माहिती असेल,' असं साहा म्हणाला. इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) चेन्नई टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली, तर या संधीचं नक्कीच सोनं करेन, असा विश्वास साहाने व्यक्त केला.
First published:

पुढील बातम्या