BCCI मुळे उद्ध्वस्त झालेलं साहाचं करिअर पंतमुळे पुन्हा ट्रॅकवर!

आफ्रिकेविरुद्ध कसोटीत यष्टीरक्षणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या साहाचं करिअर गेल्यावर्षी बीसीसीआच्या एका चुकीमुळे जवळपास संपुष्टात आलं होतं.

News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2019 11:32 AM IST

BCCI मुळे उद्ध्वस्त झालेलं साहाचं करिअर पंतमुळे पुन्हा ट्रॅकवर!

पुणे, 14 ऑक्टोबर : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्यानंतर संघात मुख्य य़ष्टीरक्षकाची जबाबदारी कोण घेणार? याचं उत्तर बीसीसीआयनं ऋषभ पंत असं दिलं. वर्ल्ड कपनंतर सर्वच प्रकारात यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आली. धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. विंडीज दौऱ्यात पंतच मुख्य यष्टीरक्षक होता. पण दक्षिण आफ्रिका दौऱ्यात कसोटीमध्ये ऋद्धिमान साहाला संधी देण्यात आली. पुनरागमन करताना साहाने यष्टीरक्षणात चपळता दाखवत सर्वांनाच चकीत केलं.

साहाने दुसऱ्या कसोटीत केलेल्या कामगिरीबद्दल उमेश यादवने मी तुला पार्टी देईन असं म्हटलं आहे. तर कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी साहा जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे असंही म्हटलं. साहाने हे सर्व दोन्ही कसोटीत सिद्ध करून दाखवलं.

आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावात दोन तर दुसऱ्या डावात तीन झेल साहाने यष्ट्यांमागे टिपले आहेत. पहिल्या कसोटीत पहिल्या डावात त्याला फलंदाजीची संधी मिळाली होती. त्यात त्याने 21 धावा काढल्या होत्या. याशिवाय यष्टीमागे एक झेलही घेतला होता.

सध्या साहा सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्या खेळत असेलेल्या यष्टीरक्षकांमध्ये साहा सर्वोत्कृष्ठ ठरला आहे. वेगवान गोलंदाजीवेळी झेल घेण्यात त्यानं आघाडी घेतली आहे. यात त्याची अचुकता 96.9 टक्के इतकी आहे. त्याच्या खालोखाल लंकेच्या निराशेन डिक्वेला 95.5 टक्के आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो 95.2 टक्क्यांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहेत. तर भारताचा यष्टीरक्षक ऋषभ पंत 91.6 टक्क्यांसह नवव्या स्थानावर आहे.

Loading...

वर्षभरापूर्वी करिअर आलंं होतं धोक्यात

साहाने यशस्वी पुनरागमन केलं असलं तरी गेल्या वर्षभरात त्याचं करिअर जवळपास संपुष्टात आलं होतं. बीसीसीआयच्या एका चुकीमुळं त्याची क्रिकेट कारकिर्द ओहोटीला लागली होती. जानेवारी 2018 मध्ये साहाच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो आयपीएलमध्ये काही सामने खेळला. मात्र, तिथं पुन्हा खांद्याला दुखापत झाली.

बीसीसीआयने साहाच्या उपचारासाठी नॅशनल क्रिकेट अकादमीतही पाठवलं. तिथं साहाला चुकीच्या प्रशिक्षणाचा फटका बसला आणि दुखापत जास्तच बिघडली. त्यामुळं त्याला खांद्यावरील सर्जरी करावी लागली. त्यासाठी साहा इंग्लंडला गेला होता.

विंडीज दौऱ्यात प्लेइंग इलेव्हमध्ये नाहीच

सर्जरीनंतर काही महिने त्याला हातदेखील हालवता येत नव्हता. त्यानंतर साहाने दुखापतीतून सावरत फलंदाजीत जबरदस्त कामगिरी केली. वेस्ट इंडिज ए दौऱ्यावर त्यानं फलंदाजी आणि यष्टीरक्षक म्हणून चांगलं योगदान दिलं. त्यानं दोन सामन्यात दोन अर्धशतक, 7 झेल आणि एका फलंदाजाला यष्टीचित केलं. यामुळेच त्याची विंडीज दौऱ्यात निवड झाली. पण पंतला संधी दिल्यानं साहाला बाकावर बसावं लागलं. यावर अनेक दिग्गजांनी टीका केली होती.

पंतच्या चुका साहाच्या पथ्यावर

साहाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी करून दाखवली आहे. त्याच्या धडाकेबाज पुनरागमनामागे ऋषभ पंतची विंडीज दौऱ्यातली खराब कामगिरीच आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पंतने मिळालेल्या संधीचा फायदा घेतला नाही. त्यानं ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये शतक केल्यानंतर अनेक चुका केल्या. विंडीजमधील कसोटी मालिकेत पंतला फक्त 19.33 च्या सरासरीनं धावा करता आल्या. चुकीचे फटके खेळून बाद झाल्यानं दिग्गजांनीही त्याला सल्ला दिला होता.

साहानं संधीचं सोनं केलं

साहानं यष्टीरक्षणात चुणूक दाखवली तितकी प्रतिभा पंतमध्ये दिसून येत नाही. संघाला मधल्या फळीतला फलंदाज तर हवाच आहे पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे चांगला यष्टीरक्षक हवा आहे. 2018 मध्ये विंडीज संघ भारत दौऱ्यावर आला होता तेव्हा पंतकडून यष्टीरक्षण करताना अनेक चुका झाल्या होत्या. त्यामुळेच साहाला संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं.

वाचा : थरूरांचं भारतीय क्रिकेटपटूवरचं ट्विट चर्चेत, नाराज झालेला श्रीसंत म्हणाला...

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2019 11:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...