कुस्तीपटू राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 02:30 PM IST

कुस्तीपटू राहुल आवारेची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

नवी दिल्ली, 29 एप्रिल : रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांच्या नावाची शिफारस केली आहे. बजरंग पुनियाने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये एकूण 8 सुवर्णपदकं मिळवली आहेत. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत विनेश फोगटनं कांस्य पदक जिंकलं होतं.

महाराष्ट्रातील कुस्तीपटू राहुल आवारे याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय हरप्रीत सिंह, दिव्या ककरन, पूजा ढांडा यांच्या नावाचीही शिफारस करण्यात आली आहे. यावर क्रिड़ा मंत्री निर्णय घेणार असून खेळाडूंच्या कामगिरीचा अहवाल पाहून पुरस्काराची घोषणा केली जाणार आहे. अर्जुन पुरस्कार 1961 साली सुरु करण्यात आला होता. अर्जूनाची मुर्ती आणि 5 लाख रुपये रोख असे या बक्षिसाचे स्वरुप आहे.

राहुल आवारेनं राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याने मेलबर्न कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण आणि आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्येही कांस्य पदक जिंकलं होतं.

बीसीसीआयनं यंदा अर्जुन पुरस्कारासाठी चार क्रिकेटरच्या नावांची शिफारस केली आहे. यात रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मह शमी यांच्या नावाचा समावेश आहे. तर, यासोबतच पुनम यादव या महिला क्रिकेटपटूचाही समावेश करण्यात आला आहे.

VIDEO: 'तू चाल पुढं.. तुला रं गड्या भीती कशाची.. पर्वा बी कुणाची'

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 29, 2019 02:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...