18 वर्षांनी भारत वर्ल्ड चॅम्पियन, या खेळाडूनं केली कमाल!

18 वर्षांनी भारत वर्ल्ड चॅम्पियन, या खेळाडूनं केली कमाल!

2001 नंतर भारताला ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळालं.

  • Share this:

तल्लीन, 15 ऑगस्ट : कुस्तीपटू दीपक पूनियानं 18 वर्षांनी भारताला ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळवून दिली. अॅस्टोनियात झालेल्या ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत त्यानं रशियाच्या एलिक शेबजुखोवला पराभूत केलं. पुरुषांच्या फ्रीस्टाइल प्रकारात 86 किलो वजनीगटात 2-2 अशी बरोबरीत कुस्ती होती. मात्र शेवटचा गुण मिळवल्यानं पूनियाला विजेता घोषित करण्यात आलं. गेल्या वर्षी या त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं.

दीपकच्या आधी 2001 मध्ये रमेश कुमार (69 किलो) पलविंदर सिंह चीमा (130 किलो) यांनी ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं. त्याशिवाय 92 किलो वजनी गटात विकीनं मंगोलियाच्या बात्मागनाइ एंखतुवशिनला पराभूत करून कांस्य पदक पटकावलं.

ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळवल्यानंतर आशियाई सुवर्णपदक विजेता बजरंग पूनियानं दीपकचं अभिनंदन केलं. त्यानं म्हटलं की, दीपक आणि विकीचे सुवर्ण आणि कांस्य पदक मिळवल्याबद्दल अभिनंदन, भविष्यासाठी शुभेच्छा!

19 वर्षीय दीपकनं कजाकिस्तानमध्ये होणाऱ्या सिनियर वर्ल्ड कुस्ती चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान पक्क केलं आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या स्पर्धेत तो 86 किलो वजनीगटात लढणार आहे. ही वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा टोकियो ऑलिम्पिक 2020 चा भाग असेल. दीपकनं 2016 च्या कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण जिंकलं होतं. 2017 च्या स्पर्धेत ज्यूनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याला सुवर्ण पदक पटकावता आलं नाही. तर 2018 ला स्लोव्हाकियात झालेल्या स्पर्धेत रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.

SPECIAL REPORT : पुरातले 'हे' असे देवदूत, ज्यांनी वाचवला अनेकांचा जीव

Published by: Suraj Yadav
First published: August 15, 2019, 9:48 AM IST
Tags: kusti

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading