बजरंगचं हंगामातील चौथं सुवर्ण तर विनेश फोगटची फायनलमध्ये धडक!

आशियाई चॅम्पियन असलेल्या कुस्तीपटू बजरंगनं हंगामातील चौथं सुवर्ण पटकावलं असून विनेश फोगटनं फायनलला धडक मारली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 09:43 AM IST

बजरंगचं हंगामातील चौथं सुवर्ण तर विनेश फोगटची फायनलमध्ये धडक!

मुंबई, 11 ऑगस्ट : भारताचे अव्वल कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्री स्पर्धेत बाजी मारली आहे. बजरंग पुनियानं तबिलिसी ग्रां प्री मध्ये त्यानं सुवर्णपदक पटकावलं. तर विनेश फोटगटनं मेदवेद कुस्ती स्पर्धेत चौथ्यांदा फायनलला धडक मारली आहे. गेल्या वर्षीसुद्धा तबिलिसी ग्रां प्रीमध्ये बजरंगनं सुवर्ण पदक जिंकलं होतं. यावेळी त्यानं फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात फायनलमध्ये इराणच्या पेइमन बिब्यानीला 2-0 ने पराभूत केलं.

आशियाई चॅम्पियन असलेल्या बजरंगचं या हंगामातील चौथं सुवर्ण पदक आहे. त्यानं तबिलिसी, आशियाई चॅम्पियनशिप याशिवाय आणखी दोन स्पर्धांमध्ये सुवर्ण जिंकलं आहे. दुसरीकडं बेलारूसमधील मिन्स्क इथं मेदवेद कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटनं महिलांच्या 53 किलोग्रॅम वजनी गटात बेलारुसच्या याफेमेनकाला पराभूत केलं. या लढतीत तिनं एकतर्फी वर्चस्व राखत 11-0 ने विजय मिळवला.

पहिल्या हाफमध्ये विनेश फोगटची दमछाक झाली पण दुसऱ्यावेळी तिनं आक्रमक पवित्रा घेतला. प्रतिस्पर्धी पैलवानावर मजबूत पकड मिळवून गुणांची कमाई केली. तिनं याफ्रेमेनकाला अनपेक्षित डाव खेळल्यानं गुण मिळवण्यात यश आलं. त्यानंतर दबावात आलेल्या याफ्रेमेनकाला विनेशनं सहज नमवलं.

अंतिम सामन्यात विनेशचा सामना रशियाच्या एन मालिशेवाविरुद्ध रंगणार आहे. तिनं सेमीफायनलमध्ये पिचोकोउस्केला पराभूत केलं होतं. विनेशनं या हंगामात स्पेन ग्रांप्री, यासर दोगू आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच पोलंड ओपनमध्ये विजय मिळवला होता.

Loading...

पाकिस्तानला जाणं 'या' धोनीला पडलं महागात, झाली निलंबनाची कारवाई!

VIDEO: वर्दीतल्या देवदूताला कडक सॅल्यूट! पूर आणि वादळातही 2 चिमुकलींंना घेऊन 'तो' चालत राहिला...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 09:41 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...