Home /News /sport /

एक दिवस आधी मृत्यूची बातमी, 24 तासात निशाने जिंकलं गोल्ड मेडल!

एक दिवस आधी मृत्यूची बातमी, 24 तासात निशाने जिंकलं गोल्ड मेडल!

भारताची कुस्तीपटू निशा दहिया (Wrestler Nisha Dahiya) हिचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी प्रसिद्ध झाली होती, पण ही बातमी खोटी असल्याचं खुद्द निशानेच व्हिडिओ शेयर करून सांगितलं. या घटनेच्या 24 तासांच्या आत निशा दहियाने राष्ट्रीय स्पर्धेत 65 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 नोव्हेंबर : भारताची कुस्तीपटू निशा दहिया (Wrestler Nisha Dahiya) हिचा गोळीबारात मृत्यू झाल्याची बातमी बुधवारी प्रसिद्ध झाली होती, पण ही बातमी खोटी असल्याचं खुद्द निशानेच व्हिडिओ शेयर करून सांगितलं. या घटनेच्या 24 तासांच्या आत निशा दहियाने राष्ट्रीय स्पर्धेत 65 किलो वजनी गटात गोल्ड मेडल पटकावलं आहे. हरियाणाच्या सोनीपतमध्ये निशा दहिया याच नावाच्या महिला कुस्तीपटूचा गोळीबारात मृत्यू झाला होता, पण नावात साधर्म्य असल्यामुळे या बातमीवरून गोंधळ झाला होता. निशा दहियाची फायनल फक्त 30 सेकंद चालली. अंडर-23 वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकलेल्या निशाने पंजाबच्या जसप्रीत कौरचा पराभव केला. 'मोहिम योग्य पद्धतीने संपल्यामुळे मी आनंदी आहे. काल झालेल्या प्रकारामुळे मी तणावात होते. मला रात्री झोपही लागली नव्हती. वजन कमी करावं लागल्यामुळे माझी उर्जाही कमी झाली होती,' असं निशा पीटीआयशी बोलताना म्हणाली. 'आपल्याबाबत चर्चा व्हावी, असं प्रत्येक खेळाडूला वाटतं, पण अशाप्रकारे कधीच होऊ नये. लोकांनी मला माझ्या कामगिरीमुळे ओळखावं, अशा घटनांमुळे नाही. कालच्या घटनेनंतर मला बरेच फोन आले. अखेर वैतागून मी फोन स्विच ऑफ केला. मला स्पर्धेवर लक्ष केंद्रीत करायचं होतं, पण त्या बातमीमुळे मी तणावात होते. सुदैवाने याचा माझ्या कामगिरीवर परिणाम झाला नाही', अशी प्रतिक्रिया निशाने दिली. निशा उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये नॅशनल रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये रेल्वेचं प्रतिनिधीत्व करत होती. 76 किल वजनी गटाच्या महिलांच्या स्पर्धेत 37 वर्षांची गुरुशरणप्रीत कौरला गोल्ड मेडल मिळालं. गुरुशरणप्रीतने पूजा सिहागचा पराभव केला. गुरुशरणप्रीतसाठी हे राष्ट्रीय पातळीवरचं हे सातवं गोल्ड मेडल होतं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या