धक्कादायक! ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर खुनाचा आरोप,पोलिसांकडून शोध सुरू

धक्कादायक! ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारवर खुनाचा आरोप,पोलिसांकडून शोध सुरू

ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशीप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) याचं नाव समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 मे :  ज्युनिअर नॅशनल चॅम्पीयनशीप स्पर्धा विजेत्या कुस्तीपटूच्या हत्या प्रकरणात एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणात ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमार (Wrestler Sushil Kumar) याचं नाव समोर आलं आहे. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सुशीलसह अन्य दोन कुस्तीपटूंच्या  घरावर धाड टाकली आहे.

काय आहे प्रकरण?

दिल्लीतील छत्रसाल स्टेडियममध्ये मागच्या आठवड्यात कुस्तीपटूंच्या दोन गटामध्ये मारामारी झाली. यामध्ये 23 वर्षांच्या एका कुस्तीपटूचा मृत्यू झाला. याबाबत 'इंडियन एक्स्प्रेस' मध्ये आलेल्या वृत्तानुसार सुशील कुमार याच्या विरोधातही या प्रकरणामध्ये आरोप आहेत. "सुशीलवर आरोप असल्यानं  आमची टीम त्याच्या घरी गेली होती. पण तिथे नव्हता. या प्रकरणातल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या टीम तयार केल्या आहेत,'' असं उत्तर पश्चिम दिल्लीचे अतिरिक्त डीसीपी डॉ. गुरिकबल सिंह यांनी सांगितले. सुशील कुमार आणि त्याच्या सहकाऱ्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे, अशी माहिती प्राथमिक तपासात पुढं आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

या मारामारीत एकाचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. मृत कुस्ताीपटूचे नाव सागर कुमार असून सोनू महल (वय, 35) आणि अमित कुमार (वय 27) हे दोघं जखमी झाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी प्राथमिक तक्रार दाखल केली असून प्रिन्स दलाल (वय 24) या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक बंदूक देखील जप्त केली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "छत्रसाल स्टेडियमच्या पार्किंगमध्ये सुशील कुमार, अजय, प्रिन्स, सोनू, सागर, अमित आणि अन्य कुस्तीपटूंमध्ये मारामारी झाली. सागर आणि त्याचे मित्र स्टेडियम जवळच्या टाऊन हॉलमधील एका घरात राहत होते. त्यांना नुकतंच हे घर रिकामं करण्याची सूचना देण्यात आली होती.

IPL 2021: विदेशी खेळाडूंच्या मदतीसाठी धावली Mumbai Indians! मायदेशी पाठवण्यासाठी करणार खास उपाय

"सागर यापूर्वी 97 किलो वजनी गटातील ग्रीक-रोमन स्पर्धेत  सहभागी झाला होता. तसंच तो माजी ज्युनिअर राष्ट्रीय चॅम्पियम आणि वरिष्ठ राष्ट्रीय शिबिराचा सदस्य होता. तर सोनू महल हा गँगस्टर काला जत्थेदीच्या जवळचा आहे. यापूर्वी देखील त्याला चोरी आणि हत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती," अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Published by: News18 Desk
First published: May 6, 2021, 10:28 AM IST

ताज्या बातम्या