दुर्दैवी! कुस्तीच्या मैदानातच पैलवानाचा मृत्यू, कोसळल्यानंतर पुन्हा उठलाच नाही

दुर्दैवी! कुस्तीच्या मैदानातच पैलवानाचा मृत्यू, कोसळल्यानंतर पुन्हा उठलाच नाही

खेळामध्ये अनेकदा खेळाडूला मैदानावरच मृत्यूने गाठल्याचे प्रकार झाले आहेत. आताही अशीच एक दुर्दैवी घटना मध्यप्रदेशात घडली आहे.

  • Share this:

सिवनी, 04 नोव्हेंबर : मध्य प्रदेशातील एका कुस्ती स्पर्धेत 19 वर्षीय कुस्तीपट्टूचा मैदानातच मृत्यू झाला. कुस्ती सुरु असताना पैलवानाचा हृदय बंद पडल्यानं मृत्यू ओढवला. शनिवारी रात्री कुस्ती सुरु असतानाच ही घटना घडल्याने कुस्तीशौकिन हळहळ व्यक्त करत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कुरई इथल्या बेलपेठ गावामध्ये कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सोनू यादव नावाचा पैलवानही याठिकाणी स्पर्धेत सहभागी झाला होता. दोन मिनिटांपर्यंत कुस्ती सुरू असताना सोनूला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी तो मैदानातच कोसळला. यावेळी प्रतिस्पर्धी पैलवानालाही काही अघटीत घडल्याची कल्पना आली नाही. जेव्हा सोनूची तब्येत बिघडल्याचं लक्षात आलं तेव्हा रुग्णालयात नेण्यात आलं. पण त्यापूर्वीच सोनूचा मृत्यू झाला होता.

सोनूच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणी नोंद करून घेतली असून सविस्तर चौकशी सुरू आहे. पोलिसांनी म्हटलं आहे की, जर तपासात रेफरी आणि आयोजकांचा बेजबाबदारपणा दिसून आला तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. रविवारी सकाळी सोनूचा मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला.

दरम्यान, प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार सोनूने एकापाठोपाठ एक कुस्त्या खेळल्या होत्या. थकवा आल्यानंतरही सोनू मैदानात उतरला होता आणि त्याच्यावर काळाने घाला घातला असं म्हटलं जात आहे.

VIDEO : आता म्हणताय येऊ का? अजित पवारांनी कार्यकर्त्यांना बजावलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: wrestling
First Published: Nov 4, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading