• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Tokyo Olympic 2020: आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल, रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये

Tokyo Olympic 2020: आणखी दोन मेडल्सकडे भारताची वाटचाल, रेसलर दीपक पुनिया आणि रवि दहिया सेमीफायनलमध्ये

Tokyo Olympics 2020: टोकयो ऑलिम्पिक 2020 मध्ये 4 ऑगस्टचा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला आहे. नीरज चोप्रानंतर आता रवि दहिया आणि दीपक पूनिया या रेसलर्समुळे भारताची आणखी दोन पदकांकडे वाटचाल सुरू झाली आहे.

 • Share this:
  टोकयो, 04 ऑगस्ट: टोकयो ऑलिम्पिक 2020 मध्ये 4 ऑगस्टचा दिवस भारतासाठी सकारात्मक ठरला आहे. नीरज चोप्रानंतर आता रवि दहिया आणि दीपक पूनिया या रेसलर्समुळे भारताची आणखी दोन पदकांकडे वाटचाल सुरू झाली आहे. रवि दहिया आणि दीपक पूनिया यांनी सेमीफायनलमध्ये मजल मारली आहे. 57 किलोग्रॅम वजनी गटात रवि दहिया आणि 86 किलोग्रॅम वजनी गटात दीपक पूनिया सेमीफाइनलमध्ये पोहोचले आहेत. टेक्निकल सुपरियारिटीनं दीपकने जिंकला सामना दीपकनं 6 मिनिटांचा वेळ संपण्याच्या 1 मिनिट आधीच टेक्निकल सुपरियारिटीनं हा कुस्ती सामना जिंकला. दीपक पुनियाने सुरुवातीपासून आघाडी कायम ठेवली होती. त्याने सुरुवातीच्या तीन मिनिटांत 4 - 1 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुढील तीन मिनिटं संपण्याच्या आधी दीपकनं 10 गुणांची आघाडी घेतली. 10 गुणांची आघाडी घेतल्यानंतर टेक्निकल सुपरियारिटीमुळं त्याला विजयी घोषित करण्यात आलं. दीपक पुनियानं नायजेरीया अगियोमोरचा पराभव केला आहे. रविकुमार दहिया देखील सेमीफायनलमध्ये भारताच्या रविकुमार दहियाने कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरसचा पराभव करत सेमीफायनल गाठली आहे. रविकुमारनं 57 किलो वजनी गटात हे यश संपादन केलं आहे. त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी केली, दहा गुणांच्या आघाडीमुळे रविकुमारनं वेळ संपण्यापूर्वीच या कुस्ती सामन्यात विजय मिळवला नीरज चोप्रा फायनलसाठी पात्र, Tokyo Olympics मध्ये भालाफेक स्पर्धेत पदकाची आशा भारतीय अॅथलिट नीरज चोप्राची टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics 2020) भालाफेक स्पर्धेत फायनलमध्ये मजल फायनल गाठण्यासाठी त्याला 83.50 मीटर अंतरावर भाला फेकणं गरजेचं होतं. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 86.65 मीटर अंतरावर थ्रो केला नीरजची आतापर्यंतची बेस्ट कामगिरी 88.07 मीटरची आहे
  First published: