Article 370 : 'सासर नको, ना संपत्ती; आम्हाला हवं फक्त...'

Article 370 : 'सासर नको, ना संपत्ती; आम्हाला हवं फक्त...'

जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत.

  • Share this:

जम्मू, 11 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमध्ये केंद्र सरकारने कलम 370 हटवल्यानंतर सोशल मीडियावर अनेक वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. काही नेत्यांनी तर, खळबळजनक विधाने करत, आता काश्मीरमधल्या मुलींशी विवाह करू शकतो असेही मत व्यक्त केले होते. या सगळ्यात भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियानं काश्मीर मुद्द्यावर बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांची कानउघडणी केली आहे. कलम 370 मुळं काश्मीरला विशेष दर्जा मिळत होता, आता तो हटवण्यात आला आहे. तर, लेह-लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले.

अशी घेतले होते बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्यांना फैलावर

बजरंगनं ट्वीट करत, “काश्मीरमध्ये सासर नको, तिकडे घरही नको फक्त आता आमचे सैनिक तिरंग्यात येऊ नये, असा भारत आम्हाला हवा. जय हिंद जय भारत”, असे मत व्यक्त केले. या ट्वीटला 7 हजारहून अधिक रिट्विट केले आहे.

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य

काही दिवसांपूर्वी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी हरियाणा येथे झालेल्या सभेत, कलम 370 रद्द केल्यामुळं आता काश्मीरी मुलींसोबत तुम्ही लग्न करू शकता, असे मत व्यक्त केले होते. तसेच “जर मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी असेल तर, हा चिंतेचा विषय असेल”, असेही ते म्हणाले. यावर लोकांनी टीका करण्यात सुरुवात केली. यानंतर खट्टर यांनी आपण असे बोललो नाही, असे सांगितले. तसेच त्यांनी ट्वीट करत, “मुलींचा आम्हाला अभिमान आहे. संपूर्ण देशांच्या मुली या माझ्या मुली आहेत”, असे सांगितले.

अमित शहांनी केलं प्लॅनिंग

काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याचं विधेयक लोकसभेत मंजूर झालं आणि सरकारच्या ऐतिहासिक निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. काश्मीरमध्ये कोणत्याही स्वरूपाची घातपाताची घटना घडू नये यासाठी इथे कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे. काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यासोबतच काश्मीरचं विभाजन करण्याच्या प्रस्तावालाही संसदेने मंजुरी दिली. त्यानुसार जम्मू-काश्मीर आणि लड़ाख हे दोन केंद्रशासित प्रदेश असणार आहेत.

VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 08:05 PM IST

ताज्या बातम्या