नवी दिल्ली, 17 एप्रिल : संपूर्ण जगात कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) हाहाकार माजला आहे. भारतही या समस्येला तोंड देण्यासाठी धडपडत आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 13 हजारांवर गेली आहे. या सगळ्यात भारताची स्टार कुस्तीपटू बबीत फोगट हिनं एक वादग्रस्त ट्वीट केलं आहे. बबीताच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं आहे.
बबीता फोगटनं, " कोरोनाव्हायरस ही भारतातील दुसरी मोठी समस्या आहे. अजूनही जाहिल जमाती पहिल्या क्रमांकावर आहेत". या ट्वीटमध्ये तबलिगींचा उच्चार बबीतानं जाहिल असा केला आहे. त्यामुळं सोशल मीडियावर टीका करण्यात आली आहे. बबीतावर देशात अशा परिस्थितीत धार्मिक वाद आणि द्वेष पसरवल्याचा आरोप केला जात आहे.
वाचा-या देशात लोकांनी लॉकडाऊनची लावली वाट, पोलिसांनी 18 जणांना गोळ्या घालून केलं ठार
वाचा-भारताने तयार केली सर्वात स्वस्त टेस्ट कीट, 2 तासांत होणार कोरोनाचे निदान
एकीकडे अशा अडचणीच्या काळात वादग्रस्त टिप्पण्या न करण्याचे आवाहन करण्यात आले असताना, बबीताच्या या विधानावर टीका होत आहे. काही दिवसांपूर्वी बबितानेही असेच वादग्रस्त ट्विट केले होते, त्यामुळे ट्विटरच्या नियमांमुळे हे ट्विट काढून टाकले गेले होते.
तुम जैसे लोग कलंक हैं इस देश पर इस संकट के समय भी तुम्हें घटिया राजनीति सूझ रही है। कहीं चूल्लु भर पानी मिल जाए तो ...........
— Pradeep Gupta (@68pradeepgupta) April 15, 2020
वाचा-जिथे लोकांनी पोलिसांवर केली दगडफेक तिथेच आता कोरोनाचा कहर 24 तासांत 11 पॉझिटिव्ह
बबिताच्या वादग्रस्त विधानावर एका युझरने लिहिले की, एका मुसलमानाने तुझ्यावर चित्रपट केला आहे. नाही तर क्रिकेट सोडून या देशातील अन्य खेळाडू बऱ्याच वर्षानंतर पाणीपूरी विकताना दिसतील'. बबीताला ट्रोल करण्यात आल्यानंतर बजरंग पुनियाने तिचे समर्थन केले आहे. ट्रोल झाल्यावर बजरंग पुनिया बबिताच्या समर्थनार्थ बाहेर आला. मिल्खा सिंग, मेरी कोम, पनसिंग तोमर, गीता, बबिता या चित्रपटावर हा चित्रपट तयार झाला आहे, असे उत्तर देताना त्यांनी वापरकर्त्याला उत्तर दिले.
2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या बबिताने नुकतेच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. बबीता हरियाणामधून निवडणूकीलाही उभी राहिली होती. मात्र तिला पराभव स्वीकारावा लागला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona