रेसलमेनियात 'अंडरटेकर'ला पराभव जिव्हारी लागला, WWE तून निवृत्त झाला

90 च्या दशकातील बच्चेकंपनीचा फेव्हरेट 'डेडमॅन द अंडरटेकर'नं 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला अखेर सलाम ठोकला

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Apr 3, 2017 07:21 PM IST

रेसलमेनियात 'अंडरटेकर'ला पराभव जिव्हारी लागला, WWE तून निवृत्त झाला

03 एप्रिल : 90 च्या दशकातील बच्चेकंपनीचा फेव्हरेट 'डेडमॅन द अंडरटेकर'नं 27 वर्षांनंतर डब्ल्यूडब्ल्यूईला अखेर सलाम ठोकला आहे.

रेसलमेनिया 33 मधील रोमन रेन्ससोबत झालेल्या सामन्यात हार पत्कारावी लागल्यानंतर अंडरटेकरने रेसलमेनिया मधून निवृत्ती घेतली आहे.

रेसलमेनियाचा मुख्य सामना हा अंडरटेकर आणि रोमम रेन्स यांच्यात झाला होता. रोमन रेन्सच्या स्पीयर आणि सुपरमॅन पंचसमोर अंडरटेकर हतबल दिसला आणि त्याचा रेन्सने पराभव केला.

यापूर्वीही रेसलमेनिया 30 मध्ये ब्रॉक लेस्नरने अंडरटेकरला हरवलं होतं. रेन्सकडून झालेला पराभव हा अंडरटेकरचा रेसलमेनियातील दुसरा पराभव ठरला.

मॅचनंतर अंडरटेकर रिंगमध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला उभं राहणंही कठीण झालं होतं. चाहतेही अंडरटेकरच्या नावाने ओरडत होते. आपल्या सुपरहिरोचा पराभव पाहुन अखेरचा निरोप घेत असल्याचं पाहून चाहत्यांच्या डोळ्यातही पाणी होतं.

थोड्यावळाने अंडरटेकरने आपल्या हातातून ग्लोव्स, कोट आणि टोपी उतरवून रिंगच्या मधोमध ठेवली. त्यामुळे डेडमॅनने संन्यास घेतल्याचं स्पष्ट झालं.

रेसलमेनियात अंडरटेकर केवळ दोनदा पराभवांना सामोरा गेलाय. तर तब्बल 23 सामने जिंकले देखील आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 3, 2017 07:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close