Home /News /sport /

World Test Championship : इंग्लंडला पोहोचण्याआधीच टीम इंडियाची Playing XI निश्चित!

World Test Championship : इंग्लंडला पोहोचण्याआधीच टीम इंडियाची Playing XI निश्चित!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनपर्यंत साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 8 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) भारतीय टीमची निवड करण्यात आली आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात 18 ते 22 जूनपर्यंत साऊथम्पटनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. आयसीसीने टेस्ट क्रिकेटला लोकप्रिय करण्यासाठी 2019 साली याची सुरुवात केली होती. या चॅम्पियनशीपमध्ये सगळ्या 9 टीम 6-6 सीरिज खेळणार होत्या, यातल्या टॉप-2 टीम फायनलमध्ये पोहोचणार होत्या, पण कोरोना व्हायरसमुळे अनेक सीरज स्थगित करण्यात आल्या, त्यामुळे सरासरी अंकांसह दोन टीमची निवड करण्यात आली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जिकडे हा सामना होणार आहे, त्या साऊथम्पटनमध्ये नुकतीच काऊंटीची एक मॅच झाली. हॅम्पशायर आणि समरसेट यांच्यात झालेल्या या सामन्यात पहिल्या दोन दिवसांमध्ये 23 विकेट गेल्या, यातल्या सगळ्या विकेट फास्ट बॉलरनीच घेतल्या. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये अश्विन किंवा जडेजा यांच्यापैकी एकालाच संधी मिळू शकते. जडेजाने गेल्या काही काळात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, त्यामुळे त्याला अश्विनऐवजी खेळवलं जाऊ शकतं. अश्विननेही टेस्ट क्रिकेटमध्ये 400 पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. सध्या अश्विन टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी बॉलर आहे. साऊथम्पटनच्या मैदानात इंग्लंडच्या फास्ट बॉलरनी 6 टेस्टमध्ये 28 च्या सरासरीने 68 विकेट घेतल्या, यक भारताच्या फास्ट बॉलरना या मैदानात 2 टेस्टमध्ये 42 च्या सरासरीने 20 विकेट मिळाल्या. न्यूझीलंडच्या टीमने या मैदानात एकही सामना खेळलेला नाही. शार्दुल ठाकूरला संधी? साऊथम्पटनच्या दोन सामन्यांमध्ये भारताच्या स्पिनरनी 44 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्या, त्यामुळे टीम इंडिया एकाच स्पिनरला खेळवण्याची शक्यता जास्त आहे, त्यामुळे शार्दुल ठाकूरला ऑलराऊंडर म्हणून खेळवलं जाऊ शकतं. शार्दुलने ऑस्ट्रेलियात टेस्टमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. ब्रिस्बेन टेस्टमध्ये शार्दुलने 7 विकेट घेतल्या होत्या, तसंच पहिल्या इनिंगमध्ये 67 रनची खेळी केली होती. हे 11 खेळाडू मैदानात उतरणार? रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, इशांत शर्मा, मोहम्द शमी, जसप्रीत बुमराह भारतीय टीम विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव केएल राहुल आणि ऋद्धीमान साहा फिट झाले तर तेदेखील भारतीय टीमसोबत इंग्लंडला जातील. स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, England, New zealand, Team india

    पुढील बातम्या