मुंबई, 18 मे: इंग्लंड सरकारने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या खेळाडूंना आपल्या देशात यायला परवानगी दिली आहे. कोरोना (Corona Virus) रुग्णसंख्येमुळे इंग्लंडने दोन्ही देशांना रेड लिस्टमध्ये टाकलं आहे. खेळाडूंना इंग्लंडला यायला परवानगी देण्यात आली असली, तरी त्यांच्या कुटुंबाला इंग्लंडमध्ये जाता येणार नाही. भारतीय टीम (Team India) इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्ध (India vs England) 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs England) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून दरम्यान होणार आहे.
इव्हिनिंग स्टॅण्डर्डने दिलेल्या वृत्तानुसार खेळाडूंना सरकारच्या क्वारंटाईन सेंटरमध्येही राहावं लागणार नाही. साऊथम्पटनच्या जवळ असणाऱ्या रोज बाऊल स्टेडियममध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा सामना होणार आहे. याच स्टेडियममध्ये हॉटेल असल्यामुळे खेळाडू तिकडेच राहतील. भारताची महिला टीमही पुढच्या महिन्यात इंग्लंडमध्ये एक टेस्ट, तीन वनडे आणि तीन टी-20 खेळणार आहेत.
टीम इंडियाचा क्रिकेटपटू बनला 'सोनू सूद', गरजूंना करतोय हवी ती मदत
टीम इंडियाचे खेळाडू जवळपास 4 महिने इंग्लंडमध्ये राहणार आहेत, त्यामुळे त्यांनी कुटुंबाला घेऊन तिकडे जाण्याची इच्छा वर्तवली होती.
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तांनुसार इंग्लंडमध्ये येण्याची सवलत फक्त आंतरराष्ट्रीय मॅचसाठीच देण्यात आली आहे.
MI vs CSK मॅच ठरली सर्वात मोठी ब्लॉकबस्टर, मिळाले तब्बल इतके Views!
इंग्लंड क्रिकेट बोर्ड जुलै महिन्यात द हंड्रेड (The Hundred) स्पर्धा सुरू करणार आहे, यासाठी ही सूट देण्यात आलेली नाही, त्यामुळे पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंच्या या स्पर्धेत खेळण्याबाबत अजून काहीही स्पष्ट झालेलं नाही. महिला द हंड्रेडमध्ये भारताच्या पाच खेळाडू खेळणार आहेत, त्यांच्याबाबतही अजून निर्णय झालेला नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, England, India vs england, Sports, Team india