मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

World Test Championship : 'गोलपोस्ट बदलू नका', ICC वर संतापले रवी शास्त्री

World Test Championship : 'गोलपोस्ट बदलू नका', ICC वर संतापले रवी शास्त्री

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आयसीसीवर (ICC) टीका केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) क्वालिफिकेशनचे नियम बदलल्याबद्दल शास्त्रींनी आयसीसीवर निशाणा साधला.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

अहमदाबाद, 7 मार्च : टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी या पत्रकार परिषदेमध्ये आयसीसीवर (ICC) टीका केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) क्वालिफिकेशनचे नियम बदलल्याबद्दल शास्त्रींनी आयसीसीवर निशाणा साधला. आयसीसीने वारंवार नियम बदलण्यापासून वाचलं पाहिजे, असं शास्त्री म्हणाले. नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये भारताचा 3-1 ने विजय झाला. याचसोबत भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. या मॅचमध्ये त्यांचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे जवळपास 2020 मध्ये क्रिकेट खेळलं गेलं नाही, त्यामुळे आयसीसीने स्पर्धा सुरू असतानाच सर्वाधिक अंकाचा मापदंड बदलून सर्वाधिक विजयी टक्केवारी असणारी टीम फायनलला क्वालिफाय होईल, असा नियम केला.

'कोरोनामुळे मी ऑक्टोबर महिन्यात घरात बसलो आहे. बाकीच्या टीमपेक्षा माझे पॉईंट्स जास्त आहेत. एका आठवड्यानंतर काही नियम बदलले जातात आणि मी पहिल्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर जातो. कृपया गोलपोस्ट बदलू नका,' असा सल्ला शास्त्रींनी आयसीसीला दिला.

'काही देश रेड झोनमध्ये प्रवास करू इच्छित नाहीत. त्याबद्दल आपण समजू शकतो. पण मला यामागचं कारण कळलं पाहिजे. मी 60-70 पॉईंट्स पुढे होतो. मग मला सांगण्यात आलं की तुम्हाला ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियाला हरवायचं आहे. मागच्या 10 वर्षात ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात किती टीमनी हरवलं आहे? जर तुम्हाला ऑस्ट्रेलियाला हरवता आलं नसतं आणि घरच्या मैदानात तुम्ही इंग्लंडला 4-0ने हरवून 500 पॉईंट्स मिळवले असते, तरी तुम्ही क्वालिफाय झाला नसतात?' असा सवाल शास्त्रींनी विचारला.

रवी शास्त्री सोशल मीडियावर वारंवार ट्रोल होत असतात, पण त्यांना या ट्रोलिंगमुळे काहीही फरक पडत नाही. रविवारी झालेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेमध्ये रवी शास्त्रींनी ट्रोलिंगवर उत्तर दिलं. जर माझ्या नावाचा वापर करून कोणाला हसायला येत असेल आणि आनंद होत असेल, तर मला याबाबत काहीच अडचण नाही, असं शास्त्री म्हणाले. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही यशस्वी होता, तेव्हा लोक तुमच्यासाठी खूश होतात, पण जर तुमचा पराभव झाला तर तुमच्या कानफटातही मारली जाईल आणि लाथाही पडतील, अशी कबुली शास्त्रींनी दिली.

First published:

Tags: Cricket, India vs england, Ravi shashtri