Home /News /sport /

IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनल गाठण्यासाठी चुरशीची लढत, भारतापुढे खडतर आव्हान

IND vs AUS : वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशीप फायनल गाठण्यासाठी चुरशीची लढत, भारतापुढे खडतर आव्हान

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठीची लढत आता आणखी चुरशीची झाली आहे.

    दुबई, 17 डिसेंबर : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठीची लढत आता आणखी चुरशीची झाली आहे. फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय टीम 114 रेटिंग पॉईंट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 116.46 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडच्या टीमकडे सध्या 116.37 पॉईंट्स असून ते ऑस्ट्रेलियाच्या खूप जवळ आहेत. न्यूझीलंडचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये इनिंगने विजय झाला, त्यामुळे किवी टीम 2021 साली होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पोहोचण्याच्या आणखी जवळ गेली आहे. 26 डिसेंबरपासून न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातल्या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. या सीरिजमध्ये न्यूझीलंडचा 2-0 ने विजय झाला, तर त्यांचे 5 सीरिजमध्ये 420 पॉईंट्स होणार आहेत. या परिस्थितीमध्ये भारताला 8 टेस्टपैकी पाच किंवा चार मॅचमध्ये विजय आणि तीन टेस्ट मॅच ड्रॉ कराव्या लागणार आहेत. भारताला या सगळ्या मॅच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या मजबूत टीमविरुद्ध खेळायच्या आहेत, त्यामुळे न्यूझीलंड भारताचं फायनलला पोहोचण्याचं आव्हान आणखी खडतर करू शकतं. कोरोना व्हायरसमुळे यावर्षी बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं गेलं नाही, त्यामुळे आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या नियमांमध्ये बदल केले. आधी पॉईंट्स टेबलवरून टीमची क्रमवारी ठरत होती, पण आता विजयाच्या टक्केवारीवर क्रमवारी ठरवण्याचा निर्णय आयसीसीने घेतला. 2021 साली लॉर्ड्सवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या