मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

ICC World Test Championship: भारताच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला धक्का, पहिला क्रमांक धोक्यात

ICC World Test Championship: भारताच्या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला धक्का, पहिला क्रमांक धोक्यात

 मेलबर्न टेस्टमध्ये मिळवलेल्या विजयानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे.

  • Published by:  Shreyas

मेलबर्न, 30 डिसेंबर : मेलबर्न टेस्टमध्ये मिळवलेल्या विजयानंतर भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championship) स्पर्धेच्या फायनलमध्ये खेळण्याचं आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. बुधवारी आयसीसीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार पॉईंट्स टेबलमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे. भारताने बॉक्सिंग डे टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत 30 पॉईंट्स खिशात टाकले. त्यामुळे भारत 390 पॉईंट्स आणि विजयाची टक्केवारी 72.2% सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताविरुद्धच्या बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पराभव आणि धीम्या ओव्हर रेटसाठीच्या दंडानंतरही ऑस्ट्रेलिया 322 पॉईंट्स आणि 76.6 टक्के विजयासह पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

दुसरीकडे पाकिस्तानला 101 रनने पराभूत करत न्यूझीलंडने तिसऱ्या क्रमांकावर आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. न्यूझीलंडला या विजयासह 60 पॉईंट्स मिळाले आहेत. न्यूझीलंडची विजयी टक्केवारी 66.7 एवढी आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये इंग्लंड आणि पाकिस्तान पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. लीग स्पर्धा संपल्यानंतर टॉप-2 टीम फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतील. या लीगमध्ये प्रत्येक टेस्ट सीरिजसाठी 120 पॉईंट्स असतात. म्हणजेच दोन टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी प्रत्येक मॅचला 60 पॉईंट्स तर चार टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी प्रत्येक मॅचला 30 पॉईंट्स अशा पद्धतीने पॉईंट्सची विभागणी केली जाते.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर असला तरी विजयी टक्केवारी कमी असल्यामुळे भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोरोना व्हायरसमुळे या वर्षात जास्त मॅच झाल्या नाहीत, त्यामुळे आयसीसीने नियम बदलला आणि ज्या दोन टीमची विजयी टक्केवारी जास्त असेल, त्या 2021 साली लॉर्ड्सवर फायनल खेळतील.

First published: