मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

World Test Championship : एक चुकीचा निर्णय आणि ऑस्ट्रेलिया झाली फायनलमधून बाहेर

World Test Championship : एक चुकीचा निर्णय आणि ऑस्ट्रेलिया झाली फायनलमधून बाहेर

टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship) पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये 3-1 ने विजय मिळवत भारताने फायनलमध्ये स्थान मिळवलं. आता 18 ते 22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 मार्च : टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (ICC World Test Championship) पोहोचली आहे. इंग्लंडविरुद्धच्या सीरिजमध्ये 3-1 ने विजय मिळवत भारताने फायनलमध्ये स्थान मिळवलं. आता 18 ते 22 जूनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळतील. या मॅचमध्ये विराट कोहली आपल्या नेतृत्वात भारताला पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यासाठी मैदानात उतरेल. याशिवाय याच वर्षी भारतात टी-20 वर्ल्ड कपही होणार आहे, त्यामुळे भारतीय टीमकडे दोन आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे.

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये विजय मिळवत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमधून बाहेर केलं. पण ऑस्ट्रेलियाचा एक चुकीचा निर्णय घातक ठरला आणि त्यांना फायनलमध्ये प्रवेश मिळाला नाही. 2019 साली हेडिंग्लीमध्ये झालेल्या रोमांचक मॅचमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा एक विकेटने पराभव केला होता. बेन स्टोक्सच्या शतकामुळे इंग्लंडने 359 रनचं आव्हान 9 विकेट गमावून पूर्ण केलं. पण या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने एक मोठी चूक केली.

इंग्लंडचा स्कोअर 351 रन असताना पॅट कमिन्सने टाकलेला बॉल जॅक लिचच्या पायाला लागला. बॉल स्टम्पच्या खूप बाहेर होता, तरीही ऑस्ट्रेलियाने डीआरएस घेतला आणि त्यांनी शेवटचा डीआरएसही गमावला. यानंतर इंग्लंडला विजयासाठी दोन रनची गरज असताना नॅथन लायनने टाकलेला बॉल स्टोक्सच्या पॅडला लागला, पण अंपायरने त्याला आऊट दिला नाही. रिप्लेमध्ये बॉल पिचच्या लाईनमध्ये होता आणि स्टम्पला लागत होता, हे दिसत होतं, पण ऑस्ट्रेलियाकडे डीआरएस शिल्लक नसल्यामुळे स्टोक्स वाचला आणि इंग्लंडचा विजय झाला.

ऑस्ट्रेलियाकडे डीआरएस शिल्लक असता तर त्यांनी ती मॅच जिंकली असती. सोबतच त्यांना 24 पॉईंट्सही मिळाले असते आणि कांगारू टीम सरासरी अंकांच्या आधारे पहिल्या क्रमांकावर राहिली असती.

First published:

Tags: Australia, Cricket, England, Icc, India, New zealand, Sports