• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • World Test Championship मध्ये न्यूझीलंडची टीम पुन्हा टीम इंडियाशी भिडणार!

World Test Championship मध्ये न्यूझीलंडची टीम पुन्हा टीम इंडियाशी भिडणार!

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, यानंतर न्यूझीलंडच्या टीमला विजयी गदा देण्यात आली.

 • Share this:
  मुंबई, 27 जून : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा (India vs New Zealand) 8 विकेटने पराभव केला, यानंतर न्यूझीलंडच्या टीमला विजयी गदा देण्यात आली. आता ही गदा वाचवण्यासाठी न्यूझीलंडची टीम नोव्हेंबरमध्ये मैदानात उतरणार आहे. योगायोग म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पुढच्या सत्राची किवी टीमची सुरुवात भारताविरुद्धच होणार आहे. आयसीसीने (ICC) दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेचा कालावधी 2021-2023 एवढा ठेवला आहे. नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात दोन्ही टीममध्ये 2 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल. दुसऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची सुरुवात जुलै 2021 पासून होणार आहे. या सत्रात प्रत्येक टीम घरच्या मैदानात 3 आणि बाहेर 3 सीरिज खेळणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात भारताविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात केल्यानंतर किवी टीम बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानात दोन-दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी मे-जून महिन्यात इंग्लंड-न्यूझीलंडची सीरिज होणार आहे. दुसरीकडे विराट कोहलीची (Virat Kohli) टीम इंडिया 4 ऑगस्टपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात करणार आहे. भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यामध्ये 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाणार आहे. भारत-इंग्लंड सीरिजचं वेळापत्रक पहिली टेस्ट : 4-8 ऑगस्ट, ट्रेन्ट ब्रीज दुसरी टेस्ट : 12-16 ऑगस्ट, लॉर्ड्स तिसरी टेस्ट : 25-29 ऑगस्ट, हेडिंग्ले चौथा टेस्ट : 2-6 सप्टेंबर, केनिंग्टन ओव्हल पाचवी टेस्ट : 10-14 सप्टेंबर, ओल्ड ट्रॅफर्ड
  Published by:Shreyas
  First published: