मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

World Test Championship : ...तर फायनलमध्ये खेळणार या दोन टीम, 3 टीममध्ये स्पर्धा

World Test Championship : ...तर फायनलमध्ये खेळणार या दोन टीम, 3 टीममध्ये स्पर्धा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship) चुरस आता आणखी वाढली आहे. फायनलच्या दोन जागांसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 फेब्रुवारी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलची (World Test Championship) चुरस आता आणखी वाढली आहे. फायनलच्या दोन जागांसाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात स्पर्धा आहे. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा रद्द केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचं भवितव्य भारत आणि इंग्लंड या सीरिजवर अवलंबून आहे. तर न्यूझीलंड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये दाखल झाली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला उद्यापासून सुरूवात होत आहे. या सीरिजनंतर लॉर्ड्सवर होणाऱ्या फायनलमध्ये कोण खेळेल, हे स्पष्ट होईल.

न्यूझीलंड-इंग्लंड फायनल

न्यूझीलंड-इंग्लंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार असेल, तर यासाठी इंग्लंडला भारताला 3-0, 3-1 किंवा -0ने हरवावं लागेल.

न्यूझीलंड-भारत फायनल

न्यूझीलंड आणि भारत यांच्यात फायनल होण्यासाठी भारताला इंग्लंडला 2-0, 2-1, 3-0, 3-1 किंवा 4-0 ने हरवावं लागेल.

न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया फायनल

भारत आणि इंग्लंड यांच्यातली सीरिज 0-0, 1-1, 2-2 ने बरोबरीत सुटली, किंवा भारताचा 1-0 ने विजय झाला तर. तसंच इंग्लंडने ही सीरिज 1-0, 2-0 किंवा 2-1 ने जिंकली तर न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियामध्ये फायनल होईल.

मेलबर्न टेस्टचा ऑस्ट्रेलियाला फटका

भारताविरुद्धच्या मेलबर्नमध्ये झालेल्या बॉक्सिंग डेचा फटकाही ऑस्ट्रेलियाला बसला. त्या मॅचमधल्या स्लो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला 4 पॉईंट्स गमवावे लागले, अन्यथा ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडच्या पुढे दुसऱ्या क्रमांकावर असती. पॉईंट्स टेबलमध्ये भारत पहिल्या, न्यूझीलंड दुसऱ्या, ऑस्ट्रेलिया तिसऱ्या आणि इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे.

18-22 जूनमध्ये लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्यात येणार आहे.

First published: