• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • WTC Final आधी टीम इंडियासाठी खूशखबर, इंग्लंडने दिली महत्त्वाची परवानगी

WTC Final आधी टीम इंडियासाठी खूशखबर, इंग्लंडने दिली महत्त्वाची परवानगी

आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. यानंतर आता भारतीय खेळाडूंची नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवर (World Test Championship Final) आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्या 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल.

 • Share this:
  मुंबई, 9 मे : आयपीएल 2021 (IPL 2021) कोरोनामुळे स्थगित करण्यात आली. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयला (BCCI) हा निर्णय घ्यावा लागला. यानंतर आता भारतीय खेळाडूंची नजर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलवर (World Test Championship Final) आहे. भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्या 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. यासाठी भारतीय टीम 2 जूनला इंग्लंडला रवाना होईल. इंग्लंडला जाण्याआधी टीमला एक आठवडा भारतातच क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. यानंतर पुन्हा इंग्लंडमध्ये त्यांना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. भारतीय खेळाडूंना इंग्लंडमध्ये क्वारंटाईन व्हावं लागलं तरी त्यांना सराव करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असं वृत्त स्पोर्ट्स टुडेने दिलं आहे. साऊथम्पटनमध्ये ही फायनल खेळवली जाईल. साऊथम्पटनच्या स्टेडियममध्येच हॉटेल असल्यामुळे खेळाडू तिकडेच राहणार आहेत, त्यामुळे त्यांना मैदानात सराव करता येईल. सुरुवातीला लॉर्ड्सवर ही फायनल खेळवली जाणार होती, पण कोरोनाच्या संकटामुळे लॉर्ड्सऐवजी साऊथम्पटनमध्ये हा सामना आयोजित करण्यात आला. भारतीय टीम 25 मे रोजी मुंबईमध्ये एकत्र येईल, यानंतर 8 दिवस ते बायो-बबलमध्ये राहतील. या कालावधीत दोन ते तीन वेळा खेळाडूंची कोरोना टेस्ट करण्यात येईल. 2 जूनला भारतीय टीम इंग्लंडला रवाना होईल. तिकडे पोहोचल्यानंतर खेळाडूंना 10 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल. यानंतर 18 जूनला भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलला साऊथम्पटनमध्ये सुरुवात होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी भारतीय टीम विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव केएल राहुल आणि ऋद्धीमान साहा फिट झाले तर तेदेखील भारतीय टीमसोबत इंग्लंडला जातील. स्टॅण्डबाय खेळाडू : अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नागवासवाला
  Published by:Shreyas
  First published: