मुंबई, 8 जानेवारी : न्यूझीलंडने लागोपाठ तीन टेस्ट सीरिज 2-0 ने जिंकल्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (World Test Championsip) साठीची लढत आणखी चुरशीची झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सीरिजमध्ये 120 पॉईंट्स मिळाल्यामुळे आता न्यूझीलंड (New Zealand) च्या खात्यात 420 पॉईंट्स झाले आहेत. याआधी न्यूझीलंडने वेस्ट इंडिज आणि भारताचाही 2-0ने पराभव केला होता.
कोरोना व्हायरसमुळे 2020 साली बऱ्याच सीरिज झाल्या नाहीत, त्यामुळे आयसीसीने या स्पर्धेच्या नियमांमध्ये बदल केले. सर्वाधिक पॉईंट्स मिळवणाऱ्या टीमऐवजी ज्या टीमची विजयी टक्केवारी जास्त असेल, त्या दोन टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळणार आहेत. विजयी टक्केवारीच्या क्रमवारीत न्यूझीलंडची टीम 0.700 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातली चार टेस्ट मॅचची सीरिज सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. पण ऑस्ट्रेलिया विजयी टक्केवारीमध्ये पहिल्या आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडची टीम आता श्रीलंका आणि भारताविरुद्ध खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या वेळापत्रकात आता टेस्ट सीरिज नाही.
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेचा टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने पराभव केला, त्यामुळे त्यांना 120 पॉईंट्स मिळाले. तरीही या दोन्ही टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळण्याच्या स्पर्धेत नाहीत. दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी 0.400 एवढी तर श्रीलंकेची 0.222 एवढी आहे.
New Zealand are in the race for the #WTC21 final They have gained crucial points to strengthen their position in the ICC World Test Championship standings pic.twitter.com/MXg76iJ5Qq
— ICC (@ICC) January 6, 2021
तर भारत खेळणार फायनल
भारताचे सध्याची विजयी टक्केवारी : 72.2
भारताचे एकूण पॉईंट्स : 540 पैकी 390
भारताच्या उरलेल्या टेस्ट : ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2 टेस्ट ( प्रत्येक विजयासाठी 30 पॉईंट्स, तर ड्रॉसाठी 10 पॉईंट्स)
इंग्लंडविरुद्ध 4 टेस्ट मॅचची सीरिज ( प्रत्येक विजयासाठी 30 पॉईंट्स आणि ड्रॉसाठी 10 पॉईंट्स)
भारताने उरलेल्या 6 पैकी 4 मॅच जिंकल्या किंवा 3 विजय आणि 3 मॅच ड्रॉ केल्या तर भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायलनमध्ये पोहोचेल.
इंग्लंडची परिस्थिती
इंग्लंडची सध्याची विजयी टक्केवारी : 60.8
इंग्लंडचे एकूण पॉईंट्स : 292 पैकी 480
उरलेल्या टेस्ट : श्रीलंकेविरुद्ध दोन टेस्ट ( विजयासाठी 60 पॉईंट्स, तर ड्रॉसाठी 20 पॉईंट्स)
भारताविरुद्ध 4 टेस्ट ( प्रत्येक विजयासाठी 30 पॉईंट्स आणि ड्रॉसाठी 10 पॉईंट्स)
इंग्लंडला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल खेळायची असेल, तर त्यांना आणखी 220 पॉईंट्सची गरज आहे. त्यामुळे त्यांना श्रीलंकेविरुद्ध दोन्ही टेस्ट जिंकाव्या लागतील, तसंच भारताविरुद्ध तीन टेस्ट जिंकून 1 मॅच ड्रॉ करावी लागेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.