मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /WTC Final : टॉससाठी मैदानात उतरताच विराट मोडणार धोनीचा विक्रम, लॉईडचं रेकॉर्डही धोक्यात

WTC Final : टॉससाठी मैदानात उतरताच विराट मोडणार धोनीचा विक्रम, लॉईडचं रेकॉर्डही धोक्यात

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा तो एमएस धोनीच्या (MS Dhoni) पुढे निघून जाईल.

मुंबई, 23 मे: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा तो एमएस धोनीच्या (MS Dhoni) पुढे निघून जाईल, तसंच हा सामना जिंकला तर विराट जगातला चौथा सगळ्यात यशस्वी कर्णधार ठरेल. कोहलीने आतापर्यंत 60 मॅचमध्ये भारताचं नेतृत्व केलं आहे. सध्या तो याबाबतीत धोनीच्या बरोबर आहे. इंग्लंडच्या साऊथम्पटनमध्ये 18 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये विराट जेव्हा मैदानात उतरेल, तेव्हा तो भारताकडून सर्वाधिक टेस्टमध्ये नेतृत्व केलेला कर्णधार असेल.

कोहलीला यावर्षाच्या सुरुवातीलाच इंग्लंडविरुद्धच्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये (India vs England) हा विक्रम करता आला असता, पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या शेवटच्या तीन टेस्टमधून (India vs Australia) विराटने माघार घेतली होती.

विराट कोहलीने 2014 साली टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार झाला. तेव्हापासून 60 टेस्टमध्ये भारताचा 36 मॅचमध्ये विजय झाला. तर धोनी 60 टेस्टमध्ये 27 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारतीय टीम 2 जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. जवळपास 4 महिने चालणाऱ्या या दौऱ्यात भारतीय टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि इंग्लंडविरुद्ध 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यात एका विजयासह विराट वेस्ट इंडिजचे महान क्लाईव्ह लॉईड (Clive Lloyd) यांनाही पिछाडीवर टाकू शकतो.

लॉईड यांच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजने 74 सामने खेळले, यातल्या 36 मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा विजय झाला होता. कर्णधार म्हणून सर्वाधिक विजयाचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅम स्मिथच्या नावावर आहे. स्मिथने 109 मॅचमध्ये 53 विजय मिळवले, तर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रिकी पॉण्टिंग आहे. पॉण्टिंगने 77 मॅचमध्ये 48 विजय आणि स्टीव्ह वॉने 57 मॅचमध्ये 41 विजय मिळवले.

First published:

Tags: Cricket, MS Dhoni, Team india, Virat kohli