मुंबई, 1 जून : न्यूझीलंडची टीम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये फायनलमध्ये (World Test Championship Final) भारताविरुद्ध (India vs New Zealand) खेळणार आहे. त्याआधी न्यूझीलंड आणि इंग्लंड (England vs New Zealand) यांच्यामध्ये दोन टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. 2 जूनपासून या सीरिजला सुरुवात होईल. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 ते 22 जून या कालावधीमध्ये खेळवली जाईल. इंग्लंडविरुद्धची सीरिज आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आधी न्यूझीलंडचा फास्ट बॉलर टीम साऊदी (Tim Southee) यने काईल जेमिसनचं (Kyle Jamieson) कौतुक केलं आहे.
आयपीएल 2021 च्या आधी झालेल्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने (RCB) जेमिसनला लिलावात विकत घेतलं होतं. आयपीएल सुरू असताना आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) जेमिसनला नेट प्रॅक्टिसमध्ये ड्युक बॉलने बॉलिंग करायला सांगितली होती, पण जेमिसनने मात्र विराट कोहलीला ड्युक बॉलने बॉलिंग करायला नकार दिला. जेमिसनच्या या निर्णयाचं टीम साऊदीने कौतुक केलं. न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपआधी विराटला जेमिसनसमोर ड्युक बॉलने सराव करायचा होता, ज्याच्या फायदा त्याला या महत्त्वाच्या सामन्यात होऊ शकला असता, विराटची ही रणनिती जेमसिनने यशस्वी होऊ दिली नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल ड्युक बॉलने खेळवली जाणार आहे.
'विराटला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये कोणत्या बॉलचा सामना करावा लागू शकतो, याची एकही झलक जेमिसनने दाखवली नाही. आपण आपली ताकद बॅट्समनना का दाखवायची. विराटला जेमिसन त्याच्या जाळ्यात अडकेल असं वाटलं, पण जेमिसन फसला नाही,' असं टीम साऊदी म्हणाला.
आपल्या आतापर्यंतच्या छोट्या करियरमध्ये 6 फूट 8 इंचाच्या काईल जेमिसनने बरंच नाव कमावलं आहे. जेमिसनने 6 टेस्टमध्ये 13.27 च्या सरासरीने 36 विकेट घेतल्या, तर बॅटिंगमध्येही त्याने 56.50 च्या सरासरीने 226 रन केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, IPL 2021, New zealand, RCB, Team india, Virat kohli