मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

WTC Final : मायकल वॉनने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं, आता म्हणाला...

WTC Final : मायकल वॉनने पुन्हा टीम इंडियाला डिवचलं, आता म्हणाला...

भारतीय टीम (Team India) पुढच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉन (Michael Vaughan) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या निकालाबाबत भविष्यवाणी केली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 मे : भारतीय टीम (Team India) पुढच्या महिन्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Test Championship Final) आणि इंग्लंडविरुद्धच्या (India vs England) 5 टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडला रवाना होणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमध्ये (India vs New Zealand) 18 ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होईल. टेस्ट क्रमवारीमध्ये भारतीय टीम पहिल्या आणि न्यूझीलंडची टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे हा मुकाबला रोमांचक व्हायची शक्यता आहे. न्यूझीलंडची टीम भारतीय टीमआधीच इंग्लंडमध्ये पोहोचली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलआधी दोन टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. तर भारताला इंग्लंड दौऱ्यात सुरुवातीलाच 24 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.

एवढे दिवस क्वारंटाईन कालावधीमध्ये घालवल्यामुळे टीम इंडियाला तयारीसाठी वेळ मिळणार नाही, त्यामुळे फायनलमध्ये न्यूझीलंड जिंकेल, अशी भविष्यवाणी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मायकल वॉनने (Michael Vaughan) केली आहे.

'इंग्लंडमधलं वातावरण, ड्युक बॉल, भारताचा व्यस्त कार्यक्रम, हे सगळं बघता फायलनमध्ये न्यूझीलंडचा विजय होईल. भारत जेव्हा इंग्लंडमध्ये पोहोचेल, तेव्हा न्यूझीलंडच्या इंग्लंडविरुद्ध दोन टेस्ट खेळून झाल्या असतील. फायनल आधी किवी टीम या दोन टेस्टमध्ये तयारी करू शकेल. न्यूझीलंडची तयारी चांगली झाली असेल, तसंच लाल बॉलने क्रिकेट खेळलेले खेळाडू त्यांच्याकडे उपलब्ध असतील,' असं मायकल वॉन म्हणाला.

इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातली पहिली टेस्ट 2 जूनपासून लॉर्ड्सवर सुरू होईल, यानंतर 10 जूनला बर्मिंघममध्ये दुसरी टेस्ट खेळवली जाईल.

मायकल वॉनने टीम इंडियाला डिवचण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काही दिवसांपूर्वी मायकल वॉनने विराट कोहलीवर निशाणा साधला होता. केन विलियमसन भारतीय असता, तर तो जगातला सर्वोत्कृष्ट खेळाडू असता. विलियमसन कोहलीची बरोबरी करू शकत नाही, कारण त्याचे इन्स्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स नाहीत, असं काहीच दिवसांपूर्वी मायकल वॉन म्हणाला होता.

इंग्लंड टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती, तेव्हाही मायकल वॉनने भारतीय टीमला टोमणा मारला होता. मुंबई इंडियन्सची टीम ही टीम इंडियापेक्षा चांगली असल्याचं वक्तव्य वॉनने केलं होतं.

First published:

Tags: Cricket, Team india