WTC Final : इंग्लंड दौऱ्यात यशस्वी, तरीही टीम इंडियाने या बॉलर्सना वगळलं

WTC Final : इंग्लंड दौऱ्यात यशस्वी, तरीही टीम इंडियाने या बॉलर्सना वगळलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 जून पासून साऊथम्पटनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हा सामना होईल.

  • Share this:

मुंबई, 12 मे : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल (World Championship Final) आणि इंग्लंड दौऱ्यासाठी (India vs England) भारतीय टीमची घोषणा करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल 18 जून पासून साऊथम्पटनमध्ये भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात हा सामना होईल. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज खेळवली जाईल, या दोन्ही सीरिजमध्ये भारताने लेग स्पिनरना संधी दिलेली नाही.

इंग्लंडमध्ये लेग स्पिनर्सचं (Leg Spinner) रेकॉर्ड चांगलं असतानाही भारताने एकालाही संधी दिली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. परदेशी स्पिनर म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नच्या (Shane Warne) नावावर आहे. शेन वॉर्नने इंग्लंडमध्ये 22 टेस्टमध्ये 129 विकेट घेतल्या, यात 8 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि 3 वेळा मॅचमध्ये 10 विकेटचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियाचा आणखी एक लेग स्पिनर क्लारेन्स ग्रीमेट या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्रीमेट यांनी 13 टेस्टमध्ये 67 विकेट घेतल्या. यात 7 वेळा इनिंगमध्ये 5 विकेट आणि एकदा मॅचमध्ये 10 विकेट होत्या.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय स्पिनरमध्येही लेग स्पिनरचा समावेश आहे. अनिल कुंबळेने (Anil Kumble) 10 टेस्टमध्ये 36 विकेट घेतल्या. लेग स्पिनर एवढे यशस्वी ठरत असतानाही भारताने टीममध्ये त्यांचा समावेश का केला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय स्पिनरमध्ये डावखुरे बिशन सिंग बेदी (Bishen Singh Bedi) दुसऱ्या क्रमांकावर आहेत, बिशनसिंग बेदी यांनी 12 मॅचमध्ये 35 विकेट घेतल्या, तर तिसऱ्या क्रमांकावर लेग स्पिनर चंद्रशेखर (Chandrashekhar) आहेत, त्यांनी 9 सामन्यांमध्ये 31 विकेट मिळवल्या.

पाकिस्तानचा माजी लेग स्पिनर दानिश कनेरिया (Danish Kaneria) यानेही टीम इंडियाच्या या रणनितीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारताची टीम मजबूत असली तरी, त्यांनी एकाही लेग स्पिनरला संधी दिली नाही. इंग्लंडमधली परिस्थिती लेग स्पिनर्ससाठी अनुकूल असते, असं दानिश कनेरिया म्हणाला. कनेरिया इंग्लंडच्या काऊंटीमध्ये एसेक्सकडून खेळला आहे.

Published by: Shreyas
First published: May 12, 2021, 8:15 PM IST

ताज्या बातम्या