Home /News /sport /

World Test Championship : टीम इंडियाला मिळाली सूट, ICC चा मोठा निर्णय

World Test Championship : टीम इंडियाला मिळाली सूट, ICC चा मोठा निर्णय

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship 2021) स्पर्धेची फायनल होणार आहे.

    दुबई, 2 एप्रिल : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात जून महिन्यात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप (ICC World Test Championship 2021) स्पर्धेची फायनल होणार आहे. या फायनलकडं संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं आहे. मात्र त्याचबरोबर या फायनलवर कोरोनाचं (Coronavirus) देखील सावट आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  30 सदस्यांसह इंग्लंडला जाण्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल (ICC) नं परवानगी दिली आहे. आयसीसीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीसीनं याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, 'आयसीसी बोर्डाने सदस्यांना सीनियर गटातील स्पर्धेसाठी सात अतिरिक्त खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफ नेण्याची परवानगी दिली आहे. ज्या स्पर्धेसाठी आयसोलेशन आवश्यक आहे, त्या ठिकाणी सर्व टीम बायो-बबलमध्ये राहतील. भारतामध्ये या वर्षी टी20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची सर्व व्यवस्था आणि व्हिसाचा प्रश्न पुढच्या महिन्यापर्यंत निकालात लागेल, अशी आशा आहे.' 'भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) आणि भारत सरकार यामध्ये या विषयावर सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली आहे,' असंही आयसीसीनं सांगितलं आहे. महिला वन-डे सामन्यातील दोन नियमांना बदलण्याचा निर्णय देखील आयसीसीनं गुरुवारी झालेल्या बैठकीत घेतला आहे. आता नव्या नियमानुसार महिलांच्या  वन-डे मॅचमधील पाच ओव्हर्सचा बॅटींग 'पॉवर प्ले' रद्द करण्यात आला आहे. तसंच सर्व बरोबरीत सुटलेल्या मॅचचा निर्णय हा सुपर ओव्हरमध्ये होईल. त्याचबरोबर बर्मिंगहॅममध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकूल स्पर्धेतील महिलांच्या सामन्यांना आंतरराष्ट्रीय मॅचचा दर्जा देण्यात आला आहे. ( वाचा : On This Day : धोनीचा अजरामर सिक्स, सचिनचे अश्रू आणि कधीही न विसरता येणारी 'ती' रात्र ) अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित बांगलादेशमध्ये यावर्षी होणारी महिलांचा पहिला अंडर 19 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा निर्णय आयसीसीनं घेतला आहे. आयसीसीनं 50 लाख डॉलर्सचा सदस्य मदत निधी तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या सदस्यांना अनुदान देण्यासाठी याचा वापर केला जाणार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: BCCI, Icc, Team india

    पुढील बातम्या