World Test Championship : टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

World Test Championship : टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे.

  • Share this:

लंडन, 27 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये यजमान इंग्लंडने चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. यातच आता आयसीसीच्या वतीने कसोटी क्रिकेट वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. गेल्या काही वर्षात कसोटी क्रिकेटचा चाहता वर्ग कमी झाल्यामुळे आयसीसीने  कसोटी वर्ल्ड कपचे आयोजन केले आहे. दरम्यान आयसीसी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेला भारतीय संघही ICC Test Championshipमध्ये सहभागी होणार आहे.

आयसीसी कसोटी वर्ल्ड कपला 1 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात होणाऱ्या अॅशेस मालिकेपासून सुरुवात होत 2021पर्यंत चालणार आहे. मात्र या वर्ल्ड कपचे नियम एकदिवसीय वर्ल्ड कपपेक्षा वेगळे असणार आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये काय आहे

एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कपच्या धर्तीवर पहिल्यांदाच टेस्ट चॅम्पियनशीपचे आयोजन करण्यात आले आहे. यात एकदिवसीय आणि टी-20 वर्ल्ड कप प्रमाणे खेळाडूंच्या जर्सीवर त्यांचे नाव आणि जर्सी नंबर असणार आहे. याआधी कसोटी क्रिकेटमध्ये पांढऱ्या रंगाच्या जर्सीचा वापर केला जात होता.

भारत-वेस्टइंडीज सीरीजही याचा भाग

वर्ल्ड कपनंतर भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. यात 2 कसोटी सामन्यांचाही समावेश आहे. या मालिकेसोबत भारताचे टेस्ट चॅम्पियनशीप अभियान सुरू होणार आहे. त्यामुळं वर्ल्ड कपमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या विराट सेनेला कमबॅक करण्याची संधी मिळणार आहे.

असे आहेत टेस्ट चॅम्पियनशीपचे नियम

या स्पर्धेत आयसीसी क्रमवारीत असलेल्या टॉप 9 संघांना खेळण्याची संधी मिळणार आहे. यात संघ आपले प्रतिस्पर्धी संघ स्वतः निवडतील. संघांना दोन कसोटी सामने खेळणे अनिवार्य आहे. यात तीन मालिका घरच्या मैदानावर होणार आहेत. मालिका 2 ते 5 सामन्यांची असू शकते. यात प्रत्येक सामन्यात जिंकणाऱ्या संघाला 120 गुण मिळणार आहेत. दरम्यान गुण हे प्रत्येक सामन्यावर दिले जातील, मालिकेवर असणार नाही.

हे संघ घेणार भाग

भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, न्यूजीलँड हे संघ भाग घेतील. झिम्बाब्वे संघाला आयसीसीने निलंबित केल्यामुळे ते या स्पर्धेत भाग घेऊ शकत नाहीत.

टेस्ट चॅम्पियनसाठी असे आहेत निकष

या स्पर्धेअंती ज्या दोन संघांकडे जास्त गुण असतील ते संघ 2021मध्ये इंग्लंडमध्ये अंतिम सामना खेळतील. अंतिम सामना जिंकणारा संघ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात पहिले टेस्ट वर्ल्ड कप विजेतेपद मिळवेल.

'त्या' 7 प्रवाशांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार, पाहा LIVE VIDEO

First published: July 27, 2019, 12:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading