रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी कोनेरू हम्पी भारताची पहिलीच महिला

रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी कोनेरू हम्पी भारताची पहिलीच महिला

रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी हम्पी भारताची पहिलीच महिला तर दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 डिसेंबर : महिला जागतिक रॅपिड बुद्धिबळ चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या कोनेरू हम्पीने चीनच्या लेई टिंगजीविरुद्ध आर्मेगेडन गेम बरोबरीत सोडवली. यासह तिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केलं. कोनेरूने चीनच्या टांग झोंगियाविरुद्ध पुनरागमन करीत 12 व्या अंतिम फेरीत विजय मिळवला. त्यानतंर तिला टिंगजीविरुद्ध टायब्रेकरवर खेळावं लागलं.

कोनेरू हम्पीचा पहिल्याच फेरीत पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या फेरीनंतर 12 व्या फेरीपर्यंत हम्पीने पुनरागमन करत बरोबरी राखली. तिने 12 व्या फेरीअखेर 9 गुण मिळवले. हम्पी आणि टिंगजी यांचे गुण समान झाल्यानंतर विजेतेपदाचा निर्णय आर्मेगेडोन गेम पद्धतीनं निर्णय घेण्यात आला. यामध्ये हम्पीने विजेतेपदाला गवसणी घातली. तिचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी अभिनंदन केलं आहे.

विजेतेपद पटकावल्यानंतर हम्पी म्हणाली की,  हे माझ पहिलंच विश्वविजेतपद आहे. या विजयामुळे खुप आनंदी आणि उत्साही आहे. पहिल्या फेरीत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या फेरीध्ये मला पुनरागमन करता आलं. पुढच्या फेऱ्या अवघड होत्या तरीही विजेतेपद मिळालं. शेवटच्या क्षणी माझी स्थिती चांगली असल्याने मी विजेतेपद मिळवू शकले.

हम्पीने तिसरा गेम बरोबरीत राखला. ही बरोबरी तिच्या खेळात महत्वाची ठरली. हम्पीला विजेतेपद तर टिंगजीला रौप्य आणि अटालिकला कांस्यपदक मिळाले. रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावणारी हम्पी भारताची पहिलीच महिला तर दुसरी बुद्धिबळपटू ठरली आहे.  याआधी भारताच्या विश्वनाथ आनंदने 2017 मध्ये विजेतेपद पटकावले होते.

वाचा : टीम इंडियाचे 'हे' धुरंधर 2020 मध्ये निवृत्तीच्या वाटेवर!

Published by: Suraj Yadav
First published: December 30, 2019, 11:20 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading