World Cup क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज असा बाद झाला नाही, पाहा भन्नाट व्हिडिओ!

क्रिकेटच्या इतिहासात कदाचितच एखादा फलंदाज असा धावबाद झाला असेल.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:12 PM IST

World Cup क्रिकेटच्या इतिहासात फलंदाज असा बाद झाला नाही, पाहा भन्नाट व्हिडिओ!

टॅटन, 18 जून: आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील 23वा सामना वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात झाला. बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. वेस्ट इंडिजने 50 षटकात 322 धावांचे आव्हान बांगलादेशला दिले. या आव्हानांचा पाठलाग करताना बांगलादेशच्या फलंदाजांनी कमाल केली आणि वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. बांगलादेशचा हा विजय यंदाच्या वर्ल्डकपमधील एक धक्कादायक विजय मानला जात आहे. अर्थात काहींच्या मते बांगलादेशचा विजय हा फार धक्कादायक वैगरे नाही.

या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वेस्ट इंडिजच्या शेल्डन कोटरेल याने बांगलादेशच्या तमीमला धावबाद केले. क्रिकेटच्या इतिहासात कदाचितच असा धावबाद झाला असेल. तमीम 48 धावावर खेळत असताना 18व्या षटकातील तिसरा चेंडू शेल्डन स्वत: रोखला आणि क्षणाचा विलंब न करता चेंडू विकेटवर मारला. पुन्हा क्रीझवर पोहण्यासाठी तमीमने उडीच घेतली. पण शेल्डनने मागलेल्या चेंडूचा वेग त्याला गाठता आला नाही.वर्ल्डकपमधील हा सर्वोत्तम रन आऊट असल्याचे मानले जाते. एका छोट्या चूकीमुळे तमीमला 50 धावा पूर्ण करता आल्या नाहीत. अर्थात त्यानंतर शाकिब अल हसन (नाबाद 124) आणि लिटन दास (नाबाद 94) यांनी यांनी बांगलादेशला दणदणीत विजय मिळवून दिला. त्यांनी विजयाचे लक्ष 41.3 षटकातच पूर्ण केले.

Loading...


VIDEO : केतकी चितळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, 'त्या' विषयाची दिली माहिती


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 09:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...