भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' खेळाडूवर का आली बर्गर विकण्याची वेळ

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या 'या' खेळाडूवर का आली बर्गर विकण्याची वेळ

आयपीएलच्या लिलावातही या खेळाडूवर फार अन्याय झाला.

  • Share this:

मुंबई, 30 एप्रिल : भारतानं तब्बल 28 वर्षानंतर 2011ला आपल्याच मायभुमीत विश्वचषकाला गवसणी घातली. यात महत्त्वाची भुमिका बजावली होती ती भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंग यानं. मात्र, विश्वचषकानंतर युवराज आपल्या आजारामुळं मैदानापासून काही काळ लांब होता. पण आता चक्क त्याच्यावर बर्गर विकण्याची वेळ आली आहे.

युवराज सिंग आयपीएलच्या बाराव्या हंगामात मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत आहे. मात्र, आयपीएलच्या लिलावात त्याच्यावर फारच अन्याय झाला. लिलावात युवराज सिंगला कोणत्याही संघानं विकत घेतले नव्हते, अखेर मुंबईच्या संघानं त्याला बेसप्राईजवर विकत घेतले. मात्र, युवराज मुंबई संघाकडून केवळ 4 सामने खेळला आहे. त्यात त्यानं 130च्या सरासरीनं 98 धावा केल्या आहेत. या सगळ्यात युवी आता चक्क बर्गर विकत आहे.

तर, झालं अस की मुंबई संघाचं प्रायोजक असलेल्या बर्गर विकणाऱ्या कंपनीच्या दुकानात युवीसह इतर खेळाडूंनी बर्गर विकले. याचा व्हिडिओ मुंबई इंडियन्स संघानेच युट्युबवर टाकला. यात युवराज सिंग आणि ईशान किशन यांच्याकडे एका मुलानं बर्गरची ऑर्डर केली. तो मुलगा ऑर्डर घेऊन गेला.

मात्र मागे वळून त्यानं युवराजकडं पाहिलं, त्यावेळी युवराजला शंका आली की यानं आपल्याला ओळखलं असेल. मात्र त्या मुलानं चक्क युवीकडं टिश्यु मागितला. यामुळं खेळाडूंमध्ये हशा पिकला. सध्या मुंबईचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना प्ले ऑफमध्ये आपले स्थान पक्क करण्यासाठी हैदराबाद आणि कोलकाता यांच्या विरोधात होणारे सामने जिंकावे लागणार आहेत.

VIDEO: अमृता फडणवीसांनी घेतली मुंबई पालिका आयुक्तांची भेट

First published: April 30, 2019, 4:54 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading