ICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू

World Cup नंतर ICC ने निवडलेल्या 11 जणांच्या संघात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनीला संधी देण्यात आलेली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2019 05:46 PM IST

ICC च्या संघात विराट-धोनीला संधी नाही, निवडले हे 11 खेळाडू

लॉर्ड्स, 15 जुलै : ICC Cricket World Cup मध्ये अंतिम सामन्यात सुपर ओव्हरमध्येही टाय झाल्यानंतर इंग्लंडने नियमाच्या आधारे बाजी मारली. न्यूझीलंडपेक्षा जास्त बाउंड्री मारल्यानं इंग्लंडला विजेता घोषित करण्यात आलं. आता इंग्लंडच्या अशा विजयानंतर आयसीसीच्या नियमांवर प्रश्न उपस्थित केला जात असला तरी विजेता ठरला आहे. दरम्यान आयीसीसने वर्ल्ड कपमधील बेस्ट प्लेइंग इलेव्हन संघ घोषित केला आहे. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीला संधी मिळाली नाही. मात्र, भारताच्या दोन खेळाडूंनी संघात स्थान मिळवलं.

ICC ने निवडलेल्या संघात इंग्लंडच्या जेसन रॉय आणि भारताच्या रोहित शर्माला सलामीवीर म्हणून निवडण्यात आलं आहे. या दोन्ही खेळाडूंनी वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहेत. रोहितने सर्वाधिक 648 धावा केल्या आहेत. जेसन रॉयने 7 सामन्यात 443 धावा केल्या आहेत. उपविजेत्या न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनचीसुद्धा संघात वर्णी लागली आहे. त्याला मालिकावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. विल्यम्सनलाच या संघाचे नेतृत्व देण्यात आलं आहे. याशिवाय इंग्लंडच्या जो रूट आणि बेन स्टोक्स हे दोन खेळाडू संघात आहेत.

अल्लाहमुळेच जिंकलो वर्ल्ड कप, इंग्लंडच्या कर्णधाराची प्रतिक्रिया

वर्ल्ड कपमध्ये आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलेल्या शाकिब अल हसनची आयसीसीने अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात निवड केली आहे. त्याने 8 सामन्यात 606 धावा आणि 11 विकेट घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक अॅलेक्स कॅरीलासुद्धा संघात घेतलं आहे. त्याने 10 सामन्यात 375 धावा केल्या. तर यष्टीरक्षण करताना 18 झेल आणि 2 यष्टीचित केले आहेत.

World Cup : न्यूझीलंडनेच जिंकलाय वर्ल्ड कप! वाचा ICCचा नियम क्रमांक 19.8

Loading...

ICC ने गोलंदाजीची धुरा ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्ककडे सोपवली आहे. त्याने स्पर्धेत सर्वाधिक 27 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या जोडीला भारताचा जसप्रीत बुमराह आणि इंग्लंडचा जोफ्रा आर्चर आणि न्यूझीलंडचा लॉकी फर्ग्युसन हे वेगवान गोलंदाज आहेत.

दोन बैलांच्या धडकेच 6 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, थरकाप उडवणारा CCTV

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...