Srilanka vs West Indies Match HighLights VIDEO : लंकेचा वेस्ट इंडिजवर विजय

Srilanka vs West Indies Match HighLights VIDEO : लंकेचा वेस्ट इंडिजवर विजय

लंकेनं वेस्ट इंडिजवर विजय मिळवून 8 गुणांसह गुणतक्त्यात सहावं स्थान पटकावलं असून इतर संघांच्या कामगिरीवर त्यांचा सेमीफायनल प्रवेश ठरणार आहे.

  • Share this:

चेस्टर ली स्ट्रीट :ICC Cricket World Cup वेस्ट इंडिजला श्रीलंकेनं पराभूत करून सेमीफायनलच्या आशा अजुनही जिवंत ठेवल्या आहेत. श्रीलंकेनं दिलेल्या 338 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 9 बाद 315 धावांपर्यंत मजल मारता आली. पूरनचे शतक आणि फॅबिअन अॅलनच्या अर्धशतकानंतरही वेस्ट इंडिजला विजय मिळवता आला नाही. गेल, ब्रेथवेट, होप, हेटमायर यांना फार काळ टिकता आलं नाही. मलिंगाने 3 विकेट घेत लंकेच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. या विजयासह लंकेचे 8 गुण झाले असून गुणतक्त्यात ते सहाव्या स्थानावर आहेत.

तत्पूर्वी, सामन्यात वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून लंकेला फलंदाजीला पाचारण केलं. लंकेनं अविष्का फर्नांडोचं शतक आणि कुसल परेराच्या अर्धशतकाच्या जोरावर 50 षटकांत 6 बाद 338 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना सलामीच्या जोडीनं 93 धावांची भागिदारी केली. जेसन होल्डरनं कर्णधार करुणारत्नेला बाद करून लंकेला पहिला धक्का दिला. त्यानंतर कुसल परेरा धावबाद झाला. परेरानंतर मेंडीस आणि अविष्का फर्नांडो यांनी डाव सावरला. संघाच्या 189 धावा झाल्या असताना मेंडीस बाद झाला. त्यानंतर मॅथ्यूजच्या साथीने अविष्कानं संघाला 250 च्या जवळ पोहचवलं. मॅथ्यूज बाद झाल्यानंतर फर्नांडोनं शतक साजरं केलं. लंकेच्या 314 धावा झाल्या असताना तो बाद झाला.

वेस्ट इंडिजला पराभूत करून लंकेच्या सेमीफायनलच्या आशा जिवंत आहेत. सध्या त्यांचे 8 गुण झाले असून पुढच्या सामन्यात त्यांना भारताशी सामना करावा लागेल. यात त्यांना विजय मिळवल्यानंतरही बांगलादेश आणि पाक आणि इंग्लंड यांचा एक पराभव तोसुद्धा मोठ्या फरकाने होण्याची प्रार्थना करावी लागेल.

श्रीलंकेच्या संघानं इंग्लंडचा पराभव करीत धक्कादायक निकाल नोंदवला होता. त्यानंतर मात्र द. आफ्रिकेविरुद्ध त्यांना 9 विकेटनं पराभव सहन करावा लागला. त्यामुळं त्यांचे सेमीफायनलमधले आव्हान आता धोक्यात आले आहे.त्यातच भारताला इंग्लंड विरोधात पराभव मिळाल्यामुळं श्रीलंकेच्या आशा आता मावळल्या आहेत. सध्या श्रीलंका गुणतालिकेत आठ सामन्यात आठ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे.

World Cup : धोनीवर भडकले दिग्गज, विराटने केली पाठराखण!

World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर

VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 1, 2019 11:45 PM IST

ताज्या बातम्या